"अमृत मित्र महोत्सवात पाचोरा शहराचा गौरव; ‘वूमन फॉर ट्रीज’ उपक्रमात 80 महिला बचत गटांचे प्रतिनिधित्व”



राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:-
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत “वूमन फॉर ट्रीज” उपक्रमात सहभागी झालेल्या महिला बचत गटांचा गौरव करण्यासाठी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे दि. 13 मार्च रोजी “अमृत मित्र महोत्सव” हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर होते. यावेळी शहरी विकास खात्याचे सचिव, सहसचिव तसेच विविध अधिकारी उपस्थित होते. देशभरातील सुमारे 30 राज्यांमधून महिला बचत गटांचे प्रतिनिधी या महोत्सवासाठी सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, एका नगरपरिषदेतून सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारे शहर म्हणून पाचोरा शहरातील तब्बल 80 महिला बचत गटांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते, ही बाब विशेष ठरली.
या कार्यक्रमात अमृत योजनेविषयी आयोजित चर्चासत्रात पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. त्यांनी पाचोरा शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. शहरात उपलब्ध असलेल्या ओपन स्पेसचे योग्य नियोजन केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महिला बचत गटांना नगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक कामे मिळण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमामुळे पाचोरा शहरातील महिला बचत गटांचा उत्साह निश्चितच वाढणार असून भविष्यात अधिकाधिक कामे करण्यासाठी महिलांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हा सहआयुक्त जनार्दन पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधीक्षक दगडू मराठे, शहर अभियान व्यवस्थापक अर्जुन भोळे, पाणीपुरवठा अभियंता श्रुतिका धात्रक, भंडारपाल प्रगती खडसे तसेच समूह संघटक कुणाल तायडे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद