नानासाहेब व्ही टी जोशी यांचा अमृत महोत्सव साजरा...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(नागरी सत्कार व गौरव ग्रंथाचे प्रकाशन)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी यांचा अमृत महोत्सव रविवार दिनांक 27 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
पीटीसी शिक्षण संस्था , एम एम महाविद्यालय व नानासाहेब व्ही टी जोशी अमृत महोत्सव समिती यांच्या वतीने एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणात अमृत महोत्सवी सत्कार व गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम झाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी , नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे , पीटीसी अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ , सेवानिवृत्त कुलगुरू डॉ के बी पाटील , पीटीसी चेअरमन संजय वाघ , शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संजय गरुड , विद्यापीठ सिनेट सदस्य दिलीप पाटील , प्र कुलगुरू एस टी इंगळे , कुलसचीव विनोद पाटील , लेखा अधिकारी रवींद्र पाटील , महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे डॉ शामकांत देवरे ,विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे अमोल पाटील , पिटीसी मानद सचिव ॲड महेश देशमुख , संचालक सतीश चौधरी , खलील देशमुख , प्राचार्य डॉ शिरीष पाटील , डॉ वासुदेव वले, डॉ जे व्ही पाटील , भावेश जोशी , चेतन जोशी आदि उपस्थित होते.
सरस्वती पूजन व पीटीसी संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रम सुरू झाला. पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जोशी परिवाराच्या वतीने 75 दिवे लावून व्ही टी जोशी व कांचन जोशी यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर पीटीसी शिक्षण संस्था व अमृत महोत्सव समितीच्या वतीने व्ही टी जोशी व कांचन जोशी यांचा शाल, श्रीफळ , ड्रेस , साडी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते ज्ञानामृत या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ विजय माहेश्वरी , आमदार सत्यजित तांबे , डॉ के बी पाटील , अरुणभाई गुजराथी यांची भाषणे झाली. व्ही टी जोशी यांनी सत्काराला उत्तर दिले. चित्रकला शिक्षक आर वाय पाटील यांनी पेन्सिलच्या साहाय्याने रेखाटलेली व्ही टी जोशी यांचे रेखाचित्र भेट देण्यात आले तसेच व्ही टी जोशी यांच्या विविध कार्यावर आधारित वृत्तपत्र कात्रण संग्रह विजय सोनजे व उमेश माळी यांनी व्ही टी जोशी यांना भेट देण्यात आला.
कार्यक्रमास पीटीसी परिवारातील सदस्य , प्रतिष्ठित नागरिक ,जोशी यांचे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुनील पाटील यांनी सन्मानपत्र वाचन केले. माजी आमदार तथा अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रा सी एन चौधरी व महेश कौंडीण्य यांनी सूत्रसंचलन केले. उपप्राचार्य वासुदेव वले यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment