नागपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे कार्यरत असलेले मा.सचिन कदम यांनी अनेक गुन्ह्यांचा योग्य तपास केल्याबद्दल त्यांना "पोलीस महासंचालक"पदक ने १ मे रोजी गौरवण्यात येणार...!



 

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 महाराष्ट्रात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना  गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट पद्धतीने केल्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे  *श्री सचिन कदम साहेब*   
यांनी पाचोरा येथे कोरोना काळात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून एक महिन्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुन्हेगारांना अटक केली होती तसेच मोटरसायकल बिना कागदपत्र बिना लायसनचे ट्रिपल सीट चालवणारे व्यक्तींना त्यांनी दंडात्मक कारवाई करून शासनाला लाखोचा महसूल दंडात्मक स्वरूपात वसूल केला होता तसेच त्यानंतर त्यांची   जळगाव बुलढाणा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्य केलेले आहे.ग्रामीण पोलीस उपाधीक्षक पदी नियुक्ती झाली होती तेथेही त्यांनी  गुन्हेगारांचा योग्य तपास करून त्यांनी अटक केली होती त्यानंतर त्यांची सध्या नागपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  येथे कार्यरत आहे.   त्यांनी हिट लिस्ट वर असलेल्या  गुन्हेगारांचा योग्य तपास करून त्यांच्यावर कारवाई केली त्यांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या योग्य तपासाचा महाराष्ट्र पोलीस खात्यातर्फे त्यांना उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून त्यांना गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट पद्धतीने केल्यामुळे *बेस्ट इन्वेस्टीगेशन साठी  2024 वर्षीचा अवार्ड मिळणार आहे* १ मे रोजी पोलीस महासंचालक पदक देण्यात येणार असून हा पदक महाराष्ट्र राज्याचे *पोलीस महासंचालक मुंबई माननीय रश्मी शुक्ला मॅडम* यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..