आज अक्षय तृतीयेच्या दिवशी पाचोरा येथे प्रांताधिकारी व तहसिलदार यांचा पाचोरा जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार बांधवांनी शाल बुके देऊन केला सत्कार..!



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी): 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्वच विषयांत उत्कृष्ट कामकाज केल्या बद्दल जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मार्फत पाचोरा उपविभागीय अधिकारी (पाचोरा-भडगाव प्रांताधिकारी) माननीय भुषण अहीरे स व कार्यालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी यांना मा.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिनांक 25 एप्रिल रोजी नियोजन भवन जळगाव येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले .... तसेच महाराष्ट्र शासन महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव"सन्मान पत्र"
महसूल प्रशासनांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात फेरफार MIS अहवाल-अनोंदणीकृत नोंदी-सर्वात कमी दिवसांत फेरफार निर्गत करणे, अंत्योदय शिधापत्रिका-D1-ED1 अंतर्गत सर्वात कमी तफावत, सामाजिक अर्थसहाय्यक योजना लाभार्थ्याची डीबीटी प्रणालवर सर्वाधिक नोंदणी टक्केवारी, लोकसेवा हमी कायद्यान्वये महा-ऑनलाईन सेवा विहीत मुदती नागरीकांना पुरिविणे व E-Office प्रणालीचा वापर
या विषयामध्ये उल्लेखनीय कामकाज केले बद्दल
विजय बनसोडे( तहसिलदार, पाचोरा) यांना सन्मानपत्र  नुकतेच गौरविण्यात आले, त्याबद्दल पाचोरा येथे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी  जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले, पत्रकार नंदकुमार शेलकर,समता सैनिक दल चे किशोर डोंगरे, पत्रकार  राजेंद्र खैरनार, पत्रकार जावेद शेख यांनी प्रांताधिकारी माननीय भुषण अहीरे ,व तहसीलदार मा.विजय बनसोडे यांचा शाल बुके देऊन सत्कार केला.यावेळी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक पवार साहेब उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..