जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या शाळेत भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यां करिता 'करिअर कंपास' हा कार्यक्रम संपन्न...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दिनांक 26 एप्रिल 2025 शनिवार रोजी जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या शाळेत भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यां करिता 'करिअर कंपास' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस एस एम एम महाविद्यालयाचे उपप्राचार्य मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.वासुदेव वले सर हे उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ.वासुदेव वले सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की करिअर मार्गदर्शन ही योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेता यावा म्हणून लहान वयातच करिअरच्या उद्दिष्टांची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे. आपले रोजचे दैनंदिन नियोजन, अभ्यास नियोजन तसेच परीक्षेचे नियोजन आधीपासून कसे करावे,परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत प्रा. डॉ.वासुदेव वले सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे विभागीय संचालक श्री रितेश ललवाणी, भारतीय जैन संघटनेचे पाचोरा अध्यक्ष राजेश जैन, महिला अध्यक्षा हर्षा संघवी,जिल्हा कार्यकारणी सचिव तृप्ती संचेती, संचालक राजेश संघवी,मनोज बांठिया, पारस मुणोत, निलेश सुराणा, मधुर बोथरा, सचिन संघवी, प्रतिभा बाफना,प्रशांत संघवी, सोनी जैन, पाश संघवी, यश संघवी, चेतन छाजेड , हेमराज बाफना, पायल बाफना, मित्तल शहा, दर्शना , खुशी बांठिया, लता बांठिया,राजश्री बडोला , हर्षाली छाजेड, सोनी जैन, प्रियंका संघवी, दिपाली संचेती, क्रितिका ओस्तवाल हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री.गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री.जीवनजी जैन, सहसचिव श्री. संजयजी बडोला, खजिनदार श्री.जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन श्री.लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव श्री. रितेशजी ललवाणी, संचालक श्री संजयजी चोरडीया,श्री.गुलाबजी राठोड श्री.प्रभुलालजी शर्मा,श्री.गोपालजी पटवारी,सौ.प्रितीजी जैन. श्री.महेंद्रकुमारजी हिरण, श्री.अशोककुमारजी मोर, श्री.शेखरकुमारजी धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे,रुपाली जाधव,प्रिती शर्मा,शितल तिवारी,दिपिका रणदिवे,योगिता शेंडे,पुजा पाटील,ज्योती बडगुजर,कविता जोशी,रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर,विद्या थेपडे,शितल महाजन,स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे,वाल्मिक शिंदे,किरण बोरसे,संगिता पाटकरी, पुजा अहिरे,पुनम कुमावत, शालिनी महाजन,कल्पना बोरसे,निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदिप परदेशी,कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर,शिवाजी ब्राम्हणे,अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी,मनिषा पाटील,शिवाजी पाटील,विकास मोरे या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बोरसे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाल्मीक शिंदे यांनी केले.
Comments
Post a Comment