चारधाम यात्रा पुर्ण करुन झाल्याचा शुभ कार्यक्रम, पाचोर्यात गंगापुजन,वास्तुपुजन, वही तुला सोहळा होणार संपन्न...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भक्ती, श्रद्धा तसेच कृतज्ञतेचा मेळ साधणाऱ्या पाचोऱ्यामधील शिवनेरी नगर येथे दिनांक 4 मे 2025 रोजी एक आगळावेगळा, अभूतपूर्व आणि पाचोरा तालुक्यात,पंचक्रोशीतमध्ये नव्हे तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होणारा पावन सोहळा संपन्न होत आहे. गंगापुजन, वास्तुशांती तसेच पुस्तक तुला या तीन गोष्टींच्या संगमाने हा कार्यक्रम एक नविन अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अध्यायाचा आरंभ ठरणार, दादासो. अरुण मोतीराम पाटील तसेच आईसो. सरुबाई अरुण पाटील यांनी आपल्या जीवनामधील एक महत्त्वाचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, द्वारका, गंगासागर, जगन्नाथपुरी, काशीविश्वेश्वर, रामेश्वरम्, बद्रीनाथ, केदारनाथ, आणि नेपाळ मधील पशुपतिनाथ मंदिर अश्या सर्व पवित्र स्थळांची चारधाम यात्रा त्यांनी पूर्ण केली. या यात्रेचा सफल, निर्विघ्न समारोप करण्यासाठी आणि भगवंत कृपेप्रती   कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता गंगापुजनाचा शुभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चारधाम यात्रेच्या निमित्ताने गंगेचे पूजन करून पवित्रतेचा महिमा वाढवण्याचा तसेच वडीलधाऱ्यांच्या पुण्यस्मृतीचे पूजन करण्याचा जो उपक्रम राबविला जात आहे, तो पूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श ठरणारा आहे. कै.मोतीराम तान्हा
पाटील, कै.नर्मदाबाई मोतीराम पाटील, कै. प्रविण रंगराव पाटील यांच्या पुण्यस्मृतींना अर्पण म्हणून हा पावित्र्य कार्यक्रम चे आयोजन केले गेले आहे. शिवनेरी नगर, कैलामाता मंदिराच्या पाठीमागे, महादेव मंदिराजवळ, भडगाव रोड, पाचोरा येथे दिनांक 4 मे 2025 रोजी या मंगल सोहळ्याचे नियोजन केले गेले  आहे. विशेषतः म्हणजे या कार्यक्रमाचा श्रीगणेशा एक दिवसाआधी, दिनांक 3 मे 2025 रोजी रात्री 8:00 वा.होत असलेल्या रविकिरण महाराज यांच्या किर्तन सोहळ्याने होत आहे. किर्तनाच्या गोड सुरावटीत अध्यात्मिक व सकारात्मक ऊर्जा निर्माण करून मुख्य कार्यक्रमासाठी भक्तीमय वातावरण तयार होईल. "गंगापुजना"च्या निमित्ताने गंगेच्या शुभ प्रवाहाची, तिच्या जीवनदायी शक्तीची व तिच्या सदैव प्रवाही पुण्यतेची महती उघडली जाणार आहे. वास्तुशांतीच्या माध्यमातून घरामधील तसेच परिसरामधील सर्व वाईट शक्तींचा नाश करून सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित केली जाणार आहे. तर 'पुस्तक तुला' या अनोख्या उपक्रमाद्वारे ज्ञानाचे महत्व अधोरेखित करत, पुस्तकांचे पूजन होणार आहे. या कार्यक्रमाचा महत्वाचा हेतू आपल्या जीवनामध्ये आई-वडिलांच्या आशीर्वादाने व त्यांच्या सुसंस्कारांनी मिळालेल्या घडामोडींचे आठवण करणे तसेच ईश्वराच्या चरणी आपल्या श्रद्धेला अर्पण करणे हा आहे. "पावन गंगा, पावन धाम, धन्य धन्य माता पिता चरण पूर्ण काम" या भक्तिरसपूर्ण ओळींमध्ये या सोहळ्याचा अर्थ दडलेला आहे. या भव्य सोहळ्याच्या निमंत्रक म्हणून निंबा मोतीराम पाटील, रंगराव मोतीराम पाटील, अरुण मोतीराम पाटील, वाल्मीक अरुण पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, कु. प्रणाली वाल्मीक पाटील, चि.अराद्य लक्ष्मण पाटील, सौ.निर्मलाबाई निंबा पाटील, सौ.मथुराबाई रंगराव पाटील, सौ.सरुबाई अरुण पाटील, सौ. वैशाली वाल्मीक पाटील, सौ. शितल लक्ष्मण पाटील, कु. देवांगी वाल्मीक पाटील, चि. पिनाक लक्ष्मण पाटील, चि.धृव हे सर्व परिवार समर्पित भावनेने निमंत्रक म्हणून पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमामुळे फक्त एक धार्मिक विधी साजरा होणार नाही, तर पाचोऱ्याचे अध्यात्मिक व सांस्कृतिक श्रीमंतीही उजळून निघणार आहे. परंपरेचे व संस्कृतीचे जे धागे आपल्या जीवनात अतूट आहेत, त्यांना या अनुषंगाने अधिक बळकट करण्याचा प्रयत्न होत आहे. या सोहळ्यात देवभक्ती, वडीलधाऱ्यांविषयीची कृतज्ञता, धर्मपरायणता, सामाजिक सलोखा तसेच संस्कृती यांचा सुंदर मेळ बघायला मिळणार आहे. वडीलधाऱ्यांच्या कष्टांना, संस्कारांना व जीवनामधील त्यागास अभिवादन करण्याचा हा एक आगळावेगळा विलोभनीय सोहळा आहे. आईवडिलांनी आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून आपल्या संततीसाठी जे स्वप्न उभे केले, त्या स्वप्नपूर्तीची तसेच त्यांच्या कष्टांची ही साक्षांतिक भर भरून द्यायची आहे. त्यांच्या आठवणींना वंदन करून गंगामातेच्या साक्षीने त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. या सोहळ्यामधील अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे 'पुस्तक तुला' उपक्रम. आताच्या तंत्रज्ञानप्रधान युगामध्ये वाचनसंस्कृतीचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम आहे. वाचनामुळे व्यक्तिमत्व घडते, विचारशक्ती प्रगल्भ होते. तसेच समाजामध्ये प्रगल्भ नागरिक घडतात. या पुस्तक तुला उपक्रमातून ज्ञानाचा सन्मान होणार असून, अनेक ग्रंथांचे पूजन आणि तुला सोहळा होणार आहे. यामधुन वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन यावर महत्त्व देण्यात येणार आहे. पाचोरा तालुक्यातील पंचक्रोशीतच नाही तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत  त्यामळे या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून, धर्मप्रेमी, वाचनप्रेमी तसेच श्रद्धावंत नागरिकांनी आवर्जून 
उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. "गंगापुजन", "वास्तुशांती" व "पुस्तक तुला" कार्यक्रमाचा सोहळा ठिकाण :-शिवनेरी नगर, कैलामाता मंदीराच्या पाठीमागे, महादेव मंदीराजवळ, भडगाव रोड, पाचोरा दिनांक : ४ मे २०२५, रविवार तर रविकिरण महाराज यांचे भावपूर्ण कीर्तन दिनांक : ३ मे २०२५, शनिवार वेळ : रात्री ८ वाजता स्थळ : वरील प्रमाणे असणार आहे. ज्या श्रद्धावानांनी आपल्या जीवनामध्ये धर्माचे, संस्कृतीचे, वडीलधाऱ्यांविषयीच्या कृतज्ञतेचे महत्व जाणले आहे, त्या सर्व भाविकांनी या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व या पावन क्षणांचे साक्षीदार व्हावे, असे आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद