💥✂️ भडगावात ‘दिलखुश’चा नवा अंदाज! नूतनीकरणानंतर मेन्स सलूनचा दिमाखदार शुभारंभ
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज भडगाव : शहरातील दिलखुश मेन्स सलूनचे नूतनीकरण करून नव्या आकर्षक रूपात भव्य उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी पाचोरा नगरपरिषदेचे गटनेते सुमितदादा पाटील, भडगाव नगरपरिषदेचे गटनेते लखीचंद भाऊ पाटील तसेच नगरसेवक यांनी सदिच्छा भेट देत नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सलूनचे संचालक श्री. भालचंद्र चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नूतनीकरणानंतर अधिक आधुनिक व आकर्षक स्वरूप प्राप्त झालेल्या ‘दिलखुश मेन्स सलून’च्या नव्या वाटचालीचे उपस्थितांनी कौतुक केले. ग्राहकांना दर्जेदार सेवा, आधुनिक सुविधा आणि आपुलकीचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या नव्या प्रवासासाठी चव्हाण परिवारास पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. भडगाव शहरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या ‘दिलखुश मेन्स सलून’च्या नव्या रूपामुळे व्यवसायाला निश्चितच नवी उंची मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.