ब्राह्मण सभागृहात डिजिटल सुरक्षेचा संदेश; सायबर वॉरियर्सचा नागरिकांशी थेट संवाद

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
जळगाव : सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सजग राहणे आवश्यक असल्याचा संदेश ब्राह्मण सभागृह येथे आयोजित सायबर सिक्युरिटी इम्पॅक्ट सेशनमधून देण्यात आला.
सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत सायबर सिक्युरिटीची माहिती दिली. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन बँकिंगचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सायबर सुरक्षेसाठी उपयुक्त असलेल्या Quick Heal Foundation च्या Anti Fraud App ची माहिती देण्यात आली. नागरिकांना ॲप डाउनलोड करून त्याचा उपयोग समजावून सांगण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..