महसूल लोकअदालतीत ७१ आरटीएस अपिलांवर होणार सुनावणी! पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात १७ सप्टेंबरला दोन सत्रांत विशेष अभियान


राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज

पाचोरा : महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या निर्देशान्वये १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात “महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रलंबित महसुली दावे व अपिलांचा जलदगतीने निपटारा करण्यावर भर देण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या महसुली दावे व अपिलांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पाचोरा येथे या अभियानाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाचोरा येथे एकूण ७१ आरटीएस अपिलांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम सत्र दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३४ अपिलांवर, तर द्वितीय सत्र सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत ३७ अपिलांवर सुनावणी होणार आहे.

तसेच या अभियानांतर्गत दि. ६ जानेवारी २०२७ रोजीही उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाचोरा येथे महसूल लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.

पक्षकार व विधीज्ञांना उपस्थित राहण्याचे आवाहन

महसुली प्रकरणांच्या जलद व प्रभावी निपटाऱ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानास संबंधित पक्षकार व त्यांचे विधीज्ञ यांनी सहकार्य करावे, तसेच नियोजित सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या महसूल लोकअदालतीमुळे प्रलंबित महसुली प्रकरणांना गती मिळून संबंधित पक्षकारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..