पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न...उद्याची आव्हाने विज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी साध्य करतील - विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा यांचे प्रतिपादन
पाचोरा -येथील पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा व विज्ञान अध्यापक मंडळ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 7 सप्टेंबर 2026 रोजी श्री गो . से.हायस्कूल पाचोरा येथे विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत तालुक्यातील 7 शाळांमधील 64 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉ.शरद पाटील एम एम कॉलेज पाचोरा यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रमाच्या उदघाटन व समारोप प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार,केंद्रप्रमुख राजेश सोनवणे, गो . से हायस्कूल मुख्याध्यापक आर एल पाटील, विज्ञान समन्वयक रवींद्र चौधरी, आर. एच. सूर्यवंशी, उल्हास पाटील, रवींद्र वाणी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी आजचे विद्यार्थी उद्याची आव्हाने विज्ञानाच्या साह्याने पार पाडतील असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गो से. हायस्कूलचे मुख्याध्यापक आर एल पाटील सर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला बिस्कीट पुडा वाटून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विज्ञान शिक्षक आर एच सूर्यवंशी सर कन्या हायस्कूल नगरदेवळा यांनी केले.स्पर्धेसाठी तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
*स्पर्धेचा निकाल*
प्रथम क्रमांक - डॉ.जे जी पंडित विद्यालय लोहारा
द्वितीय क्रमांक- श्री गो. से. हायस्कूल पाचोरा
तृतीय क्रमांक - ग्रामविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव (हरेश्वर)
Comments
Post a Comment