लिनेस क्लब पाचोरा तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा अध्यक्षांनी केले हेल्दी एजिंग वर मार्गदर्शन!
राजेंद्र खैरनार पाचोरा 9096237788 21 जून रोजी , लिनस क्लब ऑफ पाचोरा येथे योग दिवस साजरा होत असताना; 12 वे आंतरराष्ट्रीय योग दिवस ची थीम हेल्दी एजिंग विषयी लिनस क्लब ऑफ पाचोऱ्याच्या अध्यक्षा व स्वतः योगाचार्य प्रा. सौ जयश्री ताई वाघ यांनी माहिती दिली. भारत हा युवांचा देश असून तो वयस्क , व वृद्धांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर आयुष्याच्या प्रत्येक वळणात मानसिक भवनिक शारीरिक स्वास्थ चे जतन योग ने निश्चित स्वरुपने करता येईल, असे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी योगाचे जीवनातील महत्त्व विषाद केले. त्यांनी नियमित योग व प्राणायाम केल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते, असे प्रतिपादन केले. या प्रसंगी त्यंच्या मार्गदर्शनात ताडासन ,वृक्षासन, नौकासन , धनुषासन, पावनमुक्तासन, सूर्यनमस्कार, भस्त्रिका , अनुलोंब विलोंब , भ्रामरी प्राणायाम , ध्यान व योग निद्रा यांचा सर्वांनी अभ्यास केला. याचे परिणाम स्वरूप शांति, सकारात्मक ऊर्जा, व प्रसन्नता याची सर्वांना अनुभूति झली. या प्रसंगी PRO कु. चेतना हिर...