लिनेस क्लब पाचोरा तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा अध्यक्षांनी केले हेल्दी एजिंग वर मार्गदर्शन!
21 जून रोजी , लिनस क्लब ऑफ पाचोरा येथे योग दिवस साजरा होत असताना;
12 वे आंतरराष्ट्रीय योग दिवस ची थीम हेल्दी एजिंग विषयी लिनस क्लब ऑफ पाचोऱ्याच्या अध्यक्षा व स्वतः योगाचार्य प्रा. सौ जयश्री ताई वाघ यांनी माहिती दिली. भारत हा युवांचा देश असून तो वयस्क , व वृद्धांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर आयुष्याच्या प्रत्येक वळणात मानसिक भवनिक शारीरिक स्वास्थ चे जतन योग ने निश्चित स्वरुपने करता येईल, असे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी योगाचे जीवनातील महत्त्व विषाद केले. त्यांनी नियमित योग व प्राणायाम केल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते, असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी त्यंच्या मार्गदर्शनात ताडासन ,वृक्षासन, नौकासन , धनुषासन, पावनमुक्तासन, सूर्यनमस्कार, भस्त्रिका , अनुलोंब विलोंब , भ्रामरी प्राणायाम , ध्यान व योग निद्रा यांचा सर्वांनी अभ्यास केला. याचे परिणाम स्वरूप शांति, सकारात्मक ऊर्जा, व प्रसन्नता याची सर्वांना अनुभूति झली.
या प्रसंगी PRO कु. चेतना हिरे, मोनिका जी थेपडे, अंकिता जी अग्रवाल, रूपाली ताई पाटील, सरला ताई पाटील, मंजुषा जी अग्रवाल, मोनिका जी अग्रवाल तसेच पिंकी जी जिनोदिया प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment