श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे जागतिक योगा दिवस उत्साहात संपन्न.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे रविवार दिनांक 21 जून रोजी जागतिक योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
योगशिक्षक माननीय श्री. क्षीरसागर सर मा. गायत्री पाटील मॅडम व रीना पाटील मॅडम यांनी सर्वप्रथम योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले.
सर्व विद्यार्थी व उपस्थित शिक्षक स्टाफ समोर विविध कवायतीचे प्रकार व मनशांतीसाठी असणारे ध्यानधारणेचे विविध प्रकार वरील मान्यवरांनी स्टेजवर करून दाखवले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर,उपमुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ.ए.आर गोहील मॅम,श्री.आर.बी.बांठिया सर, श्री.एम.टी. कौंडिण्य सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. आर. बी. बोरसे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment