“एरंडे आप्पांच्या (तलाठी)स्मृतीत आरोग्यसेवेचा मानवतावादी उपक्रम; मोफत बॉडी चेकअप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”...संत गाडगेबाबा नगर येथे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक : सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरातील संत गाडगेबाबा नगर येथील महादेव मंदिर परिसरात स्व. आप्पासो अशोकराव हिरामण एरंडे (तलाठी आप्पा) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत बॉडी चेकअप शिबिर उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाले. दिवंगत आप्पांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या उपक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. दि. २० मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिरात विविध आजारांबाबत मार्गदर्शन व तपासणी करण्यात आली. वजन वाढणे अथवा कमी होणे, मायग्रेन व अर्धशिशी, पित्त-अॅसिडिटी, गॅस समस्या, महिलांच्या मासिक पाळीसंबंधित तक्रारी (PCOD), त्वचारोग, लहान मुलांचे आरोग्य व आहार, झोपेच्या समस्या, बी.पी., डायबिटीज, थायरॉईड, हृदयविकार, किडनी-लिव्हर आजार तसेच शरीरातील कॅल्शियम, व्हिटॅमिन व रक्ताची कमतरता यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे आयोजन सौ. मीनाक्षी संजय एरंडे (नगरसेविका तथा सभापती महिला व...