“एरंडे आप्पांच्या (तलाठी)स्मृतीत आरोग्यसेवेचा मानवतावादी उपक्रम; मोफत बॉडी चेकअप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”...संत गाडगेबाबा नगर येथे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक : सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरातील संत गाडगेबाबा नगर येथील महादेव मंदिर परिसरात स्व. आप्पासो अशोकराव हिरामण एरंडे (तलाठी आप्पा) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत बॉडी चेकअप शिबिर उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाले. दिवंगत आप्पांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या उपक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
दि. २० मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिरात विविध आजारांबाबत मार्गदर्शन व तपासणी करण्यात आली. वजन वाढणे अथवा कमी होणे, मायग्रेन व अर्धशिशी, पित्त-अॅसिडिटी, गॅस समस्या, महिलांच्या मासिक पाळीसंबंधित तक्रारी (PCOD), त्वचारोग, लहान मुलांचे आरोग्य व आहार, झोपेच्या समस्या, बी.पी., डायबिटीज, थायरॉईड, हृदयविकार, किडनी-लिव्हर आजार तसेच शरीरातील कॅल्शियम, व्हिटॅमिन व रक्ताची कमतरता यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

या आरोग्य शिबिराचे आयोजन सौ. मीनाक्षी संजय एरंडे (नगरसेविका तथा सभापती महिला व बाल कल्याण समिती, नगर परिषद पाचोरा) यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. सामाजिक जाणिवेतून आयोजित या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मा. नगरसेवक संजय एरंडे, गावांदे अण्णा, काळे बापू, बाबाजी ठाकरे, थोरात सर, आबा कोटकर, अशोक देवरे, महाजन बाबा, सुनील शिंदे, प्रफुल पाटील, शिवम देसले, शुभम पाटील, सागर पाटील, असित खरे, विनोद गायकवाड, प्रवीण पाटील, निलेश पाटील, अनिता एरंडे, अश्विनी एरंडे, अंजली एरंडे, देवेंद्र एरंडे व उमेश एरंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्व. तलाठी आप्पांच्या स्मृती जपत समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या मनात आदर निर्माण करणारा ठरला. आरोग्य हीच खरी संपत्ती असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..