घाम शेतकऱ्यांचा… हक्क डिझेलचा ,गरजू शेतकऱ्यांना योग्य वाटपासाठी जिल्हाधिकारी यांनी कृती समिती गठीत करा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांची मागणी”
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी: दिनांक १९/०५/२०२६ जळगाव जिल्ह्यात संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी डिझेल वाटपाबाबत निवेदन
जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांना आज शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका यांच्या वतीने महत्त्वपूर्ण निवेदन ई-मेलद्वारे पाठवण्यात आले. जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या संभाव्य इंधन तुटवड्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेती व्यवस्थेवर होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पारदर्शक व नियंत्रित पद्धतीने डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कृती समिती गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या शेती मशागतीचा अत्यंत महत्त्वाचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डिझेल वितरण प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व पोलीस पाटील यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतपातळीवर पाहणी करून खऱ्या गरजू शेतकऱ्यांची नोंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच शेती मशागतीसाठी आवश्यक डिझेलचे प्रमाण पंचनाम्याद्वारे निश्चित करून व्हिडिओ पुरावे संकलित करावेत व त्यानुसार अधिकृत मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच मंजूर डिझेलचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तसेच पेट्रोल पंपांवरील उपलब्ध डिझेलपैकी किमान ८० टक्के कोटा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment