संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोर्‍यात रक्तदानाचा जनसागर; भाजप व युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम ठरला चर्चेचा विषय


राजेंद्र खैरनार,मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा शहरात सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा प्रेरणादायी संदेश देणारा भव्य रक्तदान शिबिराचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा संकटमोचक नेते ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर मंडल व युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात युवकांसह विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत भाजप आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या उपक्रमासाठी भाजपा युवा नेते अमोल भाऊ शिंदे, संजय नाना वाघ, भाजपा नेत्या वैशाली ताई सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भाऊ काटे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश काका वाणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापु पाटील, माजी सभापती बन्सीलाल बापु पाटील, पाचोरा नगरपालिका गटनेते सुरज भाऊ वाघ, माजी नगरसेवक वासुदेव आण्णा महाजन, माजी नगरसेवक दत्ता भाऊ जडे, अनिल धना पाटील, पाचोरा शहराध्यक्ष दिपक भाऊ माने यांच्यासह भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर मंडल व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच जगदीश पाटील, समाधान मुळे, महेश माळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश ठाकुर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहन मिश्रा, नगरसेवक टिपू देशमुख, वीरेंद्र चौधरी, उमेश माळी, संदीप पाटील, विजय महाजन, पवन जडे, संदीप जैन, विनोद पाटील, स्वप्नील भोसले सर, संदीप सराफ, गणेश झानझोटे, भावेश पटेल, वाल्मिक जाधव आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केवळ वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी कार्यातून जनतेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न भाजप व युवा मोर्चाने केला. आजच्या काळात राजकारणासोबत सामाजिक संवेदनशीलता जपणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा परिसरात सामाजिक, आरोग्य व जनहिताच्या विविध उपक्रमांना नेहमीच चालना मिळत असल्याचे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. रक्तदानासारख्या महादानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..