गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन....! “रक्तदान हेच श्रेष्ठ दान”; भाजप व युवा मोर्चाकडून सेवाभावी उपक्रमाची हाक


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहरात रविवारी दि. १७ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा, पाचोरा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत असून युवकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात अपघात, शस्त्रक्रिया तसेच गंभीर रुग्णांसाठी रक्ताची गरज सतत भासत असते. अशा वेळी रक्तदानासारखा मानवतेचा संदेश देणारा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श भाजप कार्यकर्त्यांनी समोर ठेवला आहे.

या रक्तदान शिबिरात शहरातील युवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक तसेच रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. “एक रक्तदाताच अनेकांचे प्राण वाचवू शकतो,” या भावनेतून सर्व तरुणांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन अध्यक्ष दिपक माने, सरचिटणीस समाधान मुळे व जगदीश पाटील यांनी केले आहे.

सेवा, समर्पण आणि समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम पाचोरा शहरासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद