जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या सर्वज्ञ हॉस्पिटलमध्ये मूळव्याध, फिशर व फिस्टुलावर वेदनामुक्त आधुनिक उपचारांचा विश्वास
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल चाळीसगाव | प्रतिनिधी मूळव्याध, फिशर व फिस्टुला या त्रासदायक आजारांमुळे अनेक रुग्ण शारीरिक वेदना व मानसिक अस्वस्थतेला सामोरे जात आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे असलेल्या सर्वज्ञ हॉस्पिटलमुळे अशा रुग्णांसाठी दिलासादायक पर्याय उपलब्ध झाला आहे. येथे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या आजारांवर सुरक्षित, वेदनामुक्त व प्रभावी उपचार करण्यात येत आहेत. सर्वज्ञ हॉस्पिटलमध्ये डॉ. हर्षल सोनवणे (एम.बी.बी.एस., एम.एस. – जनरल सर्जरी) यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान करून उपचार केले जात आहेत. उपचार प्रक्रियेत रुग्णांची गोपनीयता, सुरक्षितता आणि वेदनारहित सेवा यांना विशेष प्राधान्य दिले जाते. शस्त्रक्रिया तसेच औषधोपचारांची सुसज्ज व्यवस्था येथे उपलब्ध असून उपचारानंतर लवकर बरे होण्यास मदत होत आहे. इन्शुरन्स व कॅशलेस उपचार सुविधेमुळे आर्थिकदृष्ट्याही रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, चाळीसगावसह परिसरातील रुग्णांचा सर्वज्ञ हॉस्पिटलकडे वाढता विश्वास दिसून येत आहे. 📍 पत्ता : स्ट...