प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्णस्मृतीतून उभा राहिलेला विश्वासाचा व्यवसाय : १९८९ पासुन पाचोरा शहरातील अश्विनी ऑटोमोबाईल्सची ३७ वर्षांची सेवायात्रा
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा शहरासाठी प्रजासत्ताक दिन हा केवळ राष्ट्रीय उत्सव न राहता विश्वास, सचोटी आणि सातत्याची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या व्यवसायाची गौरवशाली आठवण ठरतो आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी पाचोरा शहरातील "अश्विनी ऑटोमोबाईल्स" या प्रतिष्ठित व्यवसायाने आपल्या ३७ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमानास्पद टप्पा पूर्ण केला. प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी सुरू झालेली ही व्यवसायगाथा म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि निष्ठावान ग्राहकसेवेचा जिवंत आदर्श बनली आहे.
दिनांक २६/१/१९८९ रोजी माजी केंद्रीय मंत्री मा.विजय नवल पाटील यांच्या शुभहस्ते या व्यवसायाचा शुभारंभ झाला. अनेक चढ-उतारांवर मात करत आजही हा व्यवसाय ग्राहकसेवेचा दीप अखंडपणे उजळवत आहे. अश्विनी ऑटोमोबाईल्ससह विवेक टायर फार्म, अष्टविनायक इंटरप्रायझेस, अद्वय इंटरप्रायझेस व अश्विनी ऑटो गॅरेज या सेवा केंद्रांद्वारे पाचोरा शहर व तालुक्यातील शेतकरी, वाहनचालक व सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार, वाजवी दरातील स्पेअर पार्ट्स व विश्वासार्ह सेवा सातत्याने दिली जात आहे.
या यशस्वी सेवायात्रेमागे प्रोप्रायटर्स मा. नगरसेवक प्रो. श्री. संजय (बापु) हिरामण एरंडे,श्री मनोजभाऊ संतोष पाटील, श्री. उमेश (दादा) संजय एरंडे व श्री. प्रफुल्ल (दादा) संजय एरंडे यांचे सामूहिक नेतृत्व असून, मा. नगरसेवक श्री. संजयबापु एरंडे यांच्या दोन सुपुत्रांचीही या व्यवसायात मोलाची साथ लाभत आहे. आपुलकी, शांत व मनमिळाऊ स्वभाव, गोड संवाद आणि प्रामाणिक व्यवहारामुळे हा व्यवसाय केवळ दुकान न राहता पाचोरा तालुक्याच्या विश्वासाचा अभिमानास्पद अध्याय ठरला आहे.
Comments
Post a Comment