प्रजासत्ताक दिनाच्या साक्षीने सकल बौद्ध समाजाकडून पाचोऱ्यात लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा गौरव

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

पाचोरा (वार्ताहर) :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पाचोरा शहर व तालुक्यातील सकल बौद्ध समाज बांधव तसेच समाजातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा जाहीर सत्कार समारंभ सोमवारी दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील जनता वसाहत परिसरातील धम्म ध्वजाजवळ आयोजित करण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घवघवीत यश संपादन करत सुनीता किशोर आप्पा पाटील या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असून, एकूण २८ नगरसेवकांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. या लोकशाही कौलाचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी जपत सकल बौद्ध समाजाच्या वतीने या विजयी प्रतिनिधींचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील राहणार असून, यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, भारतीय बौद्ध महासभेसह विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
लोकशाही मूल्यांची जपणूक, सामाजिक समरसता आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या लोकप्रतिनिधींना दिला जाणारा हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून पाचोरा तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांनी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद