खाजगी रुग्णालयांच्या महागड्या तपासण्यांना ब्रेक! जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२८ स्लाईस सीटी स्कॅनची ऐतिहासिक भर


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध  न्यूज चॅनल 

जळगाव प्रतिनिधी |
जळगावकरांसह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी अत्याधुनिक आरोग्य सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध होत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अत्याधुनिक ‘१२८ स्लाईस सीटी स्कॅन मशीन’चे लोकार्पण होणार आहे.
या महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधेचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या १२८ स्लाईस सीटी स्कॅन मशीनमुळे हृदयविकार, अपघातग्रस्त रुग्ण तसेच गंभीर आजारांच्या निदानात वेग व अचूकता येणार आहे. कमी वेळेत अत्यंत स्पष्ट अहवाल उपलब्ध होणार असल्याने उपचार प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. शासकीय रुग्णालयात ही सुविधा सुरू झाल्यामुळे गरीब, गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात उच्च दर्जाची तपासणी उपलब्ध होणार असून, खाजगी रुग्णालयांतील महागड्या चाचण्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व उप-अधिष्ठाता तसेच क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून जळगावच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, जिल्ह्यातील आरोग्यसेवेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..