आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री कै. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण २७ जानेवारी २०२६ ला

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

पाचोरा | प्रतिनिधी
भडगाव–पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री कै. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण सोमवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी श्रद्धा व भक्तिभावाने पार पडणार आहे. या पुण्यस्मरणानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिक, आप्तेष्ट व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कै. नर्मदाबाई पाटील या संस्कार, साधेपणा, कष्टाळूपणा आणि कुटुंबवत्सलतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या जीवनातून कर्तव्यनिष्ठा, संयम आणि समाजाशी नातं जपण्याचा आदर्श पुढील पिढीला मिळाला. त्यांच्या जाण्याने पाटील कुटुंबासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. शिवलीलाताई पाटील महाराज यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कीर्तनातून जीवनमूल्ये, संस्कारांचे महत्त्व आणि मातृत्वाचा महिमा उलगडला जाणार आहे.
सदर कार्यक्रम दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता, शिवतीर्थ मैदान, चिंतामणी कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा येथे होणार आहे.
या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन
आमदार किशोर आप्पा पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, विजय मेघराज पाटील, संजय हिलाल पाटील व सुनील हिलाल पाटील
यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..