. सौ.सुमनताई गि. पाटील विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी अशोक तायडे यांची नियुक्तीसेवाज्येष्ठतेला न्याय

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
भडगाव | प्रतिनिधी
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सुमनताई गिरिधर पाटील माध्यमिक विद्यालय, भडगाव येथे पर्यवेक्षकपदी अशोक बाजीराव तायडे यांची सेवाज्येष्ठतेनुसार अधिकृत नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे चेअरमन संजयजी वाघ यांच्या शुभहस्ते नियुक्ती आदेश प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक सेवेला सन्मानाची पावती देण्यात आली.
विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, शिस्तबद्ध कार्यपद्धती व संघटन कौशल्यासाठी परिचित असलेले अशोक तायडे यांच्या नियुक्तीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीला नवे बळ मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये दिसून आली.
या प्रसंगी मुख्याध्यापक/प्राचार्य अजयजी अहिरे, सौ. सुभाष भाऊ पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साळुंखे मॅडम, प्राथमिक शिक्षक दीपक पाटील, तंत्रस्नेही डी. आर. टोणपे सर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता.
या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार दिलीप भाऊ वाघ, व्हाइस चेअरमन व्ही. टी. जोशी, मानद सचिव ॲड. महेशजी देशमुख, शालेय समिती चेअरमन दत्ताजी पवार, कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन विनयजी जकातदार, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग चेअरमन विजयजी देशपांडे तसेच सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.
याशिवाय शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, उपप्राचार्य संदीप सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला.
अनुभव, नेतृत्व व शैक्षणिक बांधिलकीच्या बळावर अशोक तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय अधिक प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..