सायबर सुरक्षित भारतासाठी विद्यार्थ्यांनी घेतली जागरूकतेची शपथ; पी. आर. हायस्कूलमध्ये सायबर जनजागृती अभियान उत्साहात
राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक सत्य शोध न्युज 9096237788 धरणगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या Cyber Warriors उपक्रमांतर्गत जे. पी. आर. हायस्कूल, धरणगाव येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात पार पडले. या सत्रात विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, OTP फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता, मजबूत पासवर्डचे महत्त्व तसेच डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर याविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेबाबत आपले ज्ञान वाढविले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी "We Are Cyber Warriors" ही सायबर सुरक्षा शपथ घेत सुरक्षित डिजिटल भारत घडविण्याचा संकल्प केला. या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य दिनेश पाटील सर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे जनजागृती सत्र सायबर वॉरियर्स साक्षी तानाजी पाटील व विद्या विशाल सोनवणे यांनी आर बी आमले यांचा मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडले.