श्री.गो.से. हायस्कूलमध्ये नूतन संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटनडिजिटल शिक्षणाला नवी दिशा;ई-लर्निंगसह आधुनिक तंत्रज्ञानाची शिक्षणाला जोड
पाचोरा : श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जोड देण्यासाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचे लोकार्पण माजी आमदार मा. दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
शिक्षण क्षेत्रात काळाच्या गरजेनुसार तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी सुसंगत शिक्षण मिळावे आणि ई-लर्निंग अधिक सक्षम व्हावे या उद्देशाने संस्थेने पंचवीस संगणक असलेली ही अद्ययावत संगणक प्रयोगशाळा साकारली आहे.ई-लर्निंग सुविधेसह आधुनिक संगणक प्रणालींनी सुसज्ज असलेली ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
प्राध्यापक स्वप्निल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासो. संजय ओंकार वाघ, व्हाइस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी, संस्थेचे पदाधिकारी खालिलदादा देशमुख, दादासो.प्रकाश एकनाथ पाटील,दादासो. योगेश पाटील, आबासो.भागवत महालपुरे, अप्पासो.मधुकर पाटील, दादासो .राकेश थेपडे, अप्पासो.सतीश चौधरी, दादासो.अर्जुनदासजी पंजाबी, दादासो सीताराम पाटील, नानासो. सुरेश देवरे, सौ. जिजाताई पाटील, सौ. मनीषाताई पाटील, अण्णासो.वासुदेव महाजन, दादासो.संजय कुमावत, डॉ. पितांबर पाटील,शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल.पाटील,पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल,पर्यवेक्षक श्री.आर.बी.बांठिया, पर्यवेक्षक श्री.एम.टी. कौंडिण्य,मुख्य लिपिक अजयभाऊ सिनकर, तसेच रणजीत पाटील सर,किरण नम्र यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आधुनिक संगणक प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, संगणक कौशल्य विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, भविष्यातील स्पर्धात्मक युगासाठी सक्षम पिढी घडविण्याच्या दिशेने श्री. गो. से. हायस्कूलने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment