सायबर गुन्ह्यांविरुद्ध विद्यार्थ्यांची सजग पावले; इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात प्रभावी जनजागृती
धरणगाव : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या Cyber Warriors उपक्रमांतर्गत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, बनावट लिंक, OTP शेअर करण्याचे धोके, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आली. उदाहरणे, संवाद आणि प्रश्नोत्तरांमुळे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी "We Are Cyber Warriors" अशी शपथ घेत सायबर सुरक्षित समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. जनजागृती सत्र *सायबर वॉरियर्स साक्षी तानाजी पाटील व विद्या विशाल सोनवणे यांनी आर बी आमले* यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडले.
Comments
Post a Comment