Posts

"मानवतेचा शुद्ध स्पंदन : पाचोरामध्ये महा रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित”

Image
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल)  पाचोरा – समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी पाचोरामध्ये रोटरी क्लब पाचोरा भडगाव, पोलीस स्टेशन पाचोरा, पाचोरा नगरपालिका आणि पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर २०२५ रोजी भव्य महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या मिशन लाइफ या उपक्रमांतर्गत या शिबिराची नोंद जागतिक स्तरावर पाठवण्यात येणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हुतात्मा स्मारक, शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या या महाशिबिरात एका रक्तदात्याच्या रक्तातून तिघांचे प्राण वाचू शकतात—ही जाणीव नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित करत आहे. रक्तदान ही केवळ वैद्यकीय मदत नाही, तर सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव देणारी कृती असल्याने या शिबिरात सर्वसामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. रक्तदात्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून उपक्रमाच्या पारदर्शक व शिस्तबद्ध आयोजनासाठी रोटरी क्लबचे सर्व सदस्य कार्...

पाचोरा तालुका स्तरीय शिक्षक ऑलिम्पियाड स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा : पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे तालुका स्तरीय विविध शिक्षक ऑलिम्पियाड स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी विजय पवार , शासकीय प्राथमिक शिक्षण अधीक्षक सरोज गायकवाड , तसेच शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे नोडल अधिकारी म्हणून केंद्रप्रमुख अनिल पाटील, जितेंद्र पाटील, शांताराम वानखेडे, सखाराम महाजन, ज्ञानेश्वर पाचोळे, चंद्रकांत मोराणकर, अभिजीत खैरनार व शेख कदीर शेख शब्बीर यांनी उत्कृष्ट कामकाज पाहिले. विषय तज्ञ गिरीश भोयर , संगणक तज्ञ सुनील शिवदे तसेच सर्व विशेष शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे : मराठी ऑलिंपियाड 🥇 प्रथम – दीपमाला प्रकाश जगताप, जि.प. प्रा. केंद्र शाळा बाळद बु. 🥈 द्वितीय – ज्ञानेश्वर संभाजी पवार, ए.टी. गुजराथी कन्या विद्यालय नगरदेवळा 🥉 तृतीय – आयेशा बेगम शेख हुसेन शेख, जि.प. उर्दू शाळा भोकरी गणित ऑलिंपियाड 🥇 प्रथम – मनोज भिकन दुसाने, जि.प. शाळा वाणेगाव निंभोरी 🥈 द्वितीय – किशोर ...

उद्या ६ डिसेंबर २०२५ शनिवारी “माझी मुलगी, माझा अभिमान” व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा...! सर्व‌ पालकांनी आपल्या मुलींसह हजर रहाण्याचे आव्हान...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा : अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान संचलित मराठा महिला दामिनी संघ, पाचोरा यांच्या वतीने “माझी मुलगी – माझा अभिमान” या जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मुलगी शिक्षण, पालकांचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना अधोरेखित करणारा असून समाजात सकारात्मकता आणि संवेदनशीलता वाढवण्याचा संदेश देणारा आहे. दि. ६ डिसेंबर २०२५, शनिवार रोजी सकाळी १०.०० वाजता , गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र फायर ब्रँड) चे प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत हंकारे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून समाजातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भक्ती-श्रद्धेचा आविष्कार : आज पाचोरा पोलीस स्टेशन येथे "दत्त जयंती उत्सव 2025" भक्तीमय वातावरणात साजरी...!

Image
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा : भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाचा सुंदर संगम घडवत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दत्त जयंती उत्सव 2025 साजरा करण्यात येत आहे. आपल्या कुलदैवताच्या कृपेने आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने यंदाचा उत्सव अधिक भक्तिमय वातावरणात संपन्न . दिनांक 4 डिसेंबर 2025, रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित या पवित्र सोहळ्यास सर्व  प्रशासन अधिकारी कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. पोलिस प्रशासन व दत्तभक्तांसाठी हा सोहळा आनंद, समाधान आणि अध्यात्मिक उर्जा देणारा  ठरला. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार साहेब यांच्या पुढाकाराने तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार वृंद, पाचोरा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आला.. पोलिस दलाच्या उपस्थितीत धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा अद्भुत संदेश या उत्सवातून देण्यात आला.  पोलीस स्टेशनमधील सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा मानमरातब वाढवणारा हा शुभमंगल  सर्वांसाठी खुला होता "अधिकारी कर्मचारी आणि सर्वांची उपस्थिती अत्यंत मोलाची ठरली” . दत्त जयंतीनिमित्त ...

"श्रद्धेचा दिव्य सोहळा : श्री दत्त जयंती महाआरती व महाप्रसाद "(नवनाथ बाबा मंदीर भारत डेअरी बस स्टॉप कृष्णापुरी पाचोरा)

Image
(राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल) पाचोरा : भक्तिभाव, अध्यात्म आणि सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संगम घडवत यावर्षीची श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दत्तभक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे. 🔹 दि. 04 डिसेंबर 2025, गुरुवार – सायं. 6.30 वा. नवनाथ मंदिर – भव्य महाआरती दीपप्रज्वलन, मंत्रोच्चार आणि भक्तिरसात बुडालेलं पवित्र वातावरण—ही महाआरती प्रत्येक श्रद्धावानासाठी आध्यात्मिक आनंदाचा अनोखा क्षण ठरणार आहे. 🔹 दि. 05 डिसेंबर 2025, शुक्रवार – सकाळी 10 वा. महाप्रसाद – नवनाथ बाबा मंदिर, भारत डेअरी बस स्टॉप, कृष्णापुरी सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजक समितीने केली आहे. हे सर्व कार्यक्रम नवनाथ बाबा मंदिर, भारत डेअरी स्टाॅप कृष्णापुरी, पाचोरा येथे पार पडणार असून, भक्तांनी शांततेत, शिस्तीत आणि भक्तिभावाने सहभागी व्हावे असे आवाहन ॐ चैत्यन्य मच्छिंद्रनाथ बाबा मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

*शभक्ती-श्रद्धेचा आविष्कार : पारोळा पोलीस स्टेशनमध्ये दत्त जयंती उत्सव 2025 उत्साहात साजरी होणार...!

Image
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल) पारोळा : भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाचा सुंदर संगम घडवत पारोळा पोलीस स्टेशनमध्ये दत्त जयंती उत्सव 2025 साजरा करण्यात येत आहे. आपल्या कुलदैवताच्या कृपेने आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने यंदाचा उत्सव अधिक भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. दिनांक 4 डिसेंबर 2025, रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. दत्तभक्तांसाठी हा सोहळा आनंद, समाधान आणि अध्यात्मिक उर्जा देणारा भाविक मेळावा ठरणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार यांच्या पुढाकाराने तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार वृंद, पारोळा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले आहे. पोलिस दलाच्या उपस्थितीत धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा अद्भुत संदेश या उत्सवातून देण्यात येणार आहे. स्थळ : पारोळा पोलीस स्टेशन, पारोळा भाविकांची मानमरातब वाढवणारा हा उत्सव सर्वांसाठी खुला असून “आपली उपस्थिती अत्यंत मोलाची” असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिक्षणाची लाल दिव्याची आशा – श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील कु. राजनंदिनी खैरे हिचे नवोदय यश...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल 9021356277) पाचोरा प्रतिनिधी:- पाचोरा -  शहरातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्तीमधून शिक्षणाची एक नवी उमेद निर्माण करणाऱ्या कु. राजनंदिनी खैरे हिने शासकीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पाचोरा तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात एक नवे पान जोडले आहे. श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा या नामवंत शाळेच्या इयत्ता पाचवी 'क' वर्गातील ही विद्यार्थिनी 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी झाली असून तिची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी निश्चित झाली आहे. या यशस्वी विद्यार्थिनीचा शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. राजनंदिनी भीमराव खैरे ही सौ. सुवर्णा व भीमराव आनंद खैरे यांची कन्या असून, पाचोरा शहरातील मिलिंद नगर भागातील दलित वस्तीमध्ये राहते. या परिसरात शैक्षणिक वातावरणाचा पूर्णतः अभाव असून, मूलभूत सुविधा सुद्धा अपुऱ्या आहेत. येथे शिक्षणाच्या दृष्टीने कोणतेही उपक्रम नियमित राबवले जात नाहीत. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या राजनं...