उद्या ६ डिसेंबर २०२५ शनिवारी “माझी मुलगी, माझा अभिमान” व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा...! सर्व‌ पालकांनी आपल्या मुलींसह हजर रहाण्याचे आव्हान...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

पाचोरा : अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान संचलित मराठा महिला दामिनी संघ, पाचोरा यांच्या वतीने “माझी मुलगी – माझा अभिमान” या जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम मुलगी शिक्षण, पालकांचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना अधोरेखित करणारा असून समाजात सकारात्मकता आणि संवेदनशीलता वाढवण्याचा संदेश देणारा आहे.

दि. ६ डिसेंबर २०२५, शनिवार रोजी सकाळी १०.०० वाजता, गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र फायर ब्रँड) चे प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत हंकारे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून समाजातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..