"श्रद्धेचा दिव्य सोहळा : श्री दत्त जयंती महाआरती व महाप्रसाद "(नवनाथ बाबा मंदीर भारत डेअरी बस स्टॉप कृष्णापुरी पाचोरा)


(राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल)

पाचोरा : भक्तिभाव, अध्यात्म आणि सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संगम घडवत यावर्षीची श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दत्तभक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

🔹 दि. 04 डिसेंबर 2025, गुरुवार – सायं. 6.30 वा.
नवनाथ मंदिर – भव्य महाआरती
दीपप्रज्वलन, मंत्रोच्चार आणि भक्तिरसात बुडालेलं पवित्र वातावरण—ही महाआरती प्रत्येक श्रद्धावानासाठी आध्यात्मिक आनंदाचा अनोखा क्षण ठरणार आहे.

🔹 दि. 05 डिसेंबर 2025, शुक्रवार – सकाळी 10 वा.
महाप्रसाद – नवनाथ बाबा मंदिर, भारत डेअरी बस स्टॉप, कृष्णापुरी
सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजक समितीने केली आहे.

हे सर्व कार्यक्रम नवनाथ बाबा मंदिर, भारत डेअरी स्टाॅप कृष्णापुरी, पाचोरा येथे पार पडणार असून, भक्तांनी शांततेत, शिस्तीत आणि भक्तिभावाने सहभागी व्हावे असे आवाहन ॐ चैत्यन्य मच्छिंद्रनाथ बाबा मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..