भक्ती-श्रद्धेचा आविष्कार : आज पाचोरा पोलीस स्टेशन येथे "दत्त जयंती उत्सव 2025" भक्तीमय वातावरणात साजरी...!
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा : भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाचा सुंदर संगम घडवत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दत्त जयंती उत्सव 2025 साजरा करण्यात येत आहे. आपल्या कुलदैवताच्या कृपेने आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने यंदाचा उत्सव अधिक भक्तिमय वातावरणात संपन्न .
दिनांक 4 डिसेंबर 2025, रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित या पवित्र सोहळ्यास सर्व प्रशासन अधिकारी कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. पोलिस प्रशासन व दत्तभक्तांसाठी हा सोहळा आनंद, समाधान आणि अध्यात्मिक उर्जा देणारा ठरला.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार साहेब यांच्या पुढाकाराने तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार वृंद, पाचोरा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आला.. पोलिस दलाच्या उपस्थितीत धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा अद्भुत संदेश या उत्सवातून देण्यात आला.
पोलीस स्टेशनमधील
सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा मानमरातब वाढवणारा हा शुभमंगल सर्वांसाठी खुला होता "अधिकारी कर्मचारी आणि सर्वांची उपस्थिती अत्यंत मोलाची ठरली” .
दत्त जयंतीनिमित्त पाचोरा पोलीस ठाण्यात भक्तिमय वातावरण; पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या हस्ते पूजा-अर्चना
दत्त जयंतीच्या शुभप्रसंगी पाचोरा पोलीस स्टेशन परिसरातील दत्त मंदिरात सकाळी भक्तिभावाने पूजा व आरतीचा सोहळा पार पडला. पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार यांनी स्वतः उपस्थित राहून पूजा-अर्चना केली. त्यांच्या सोबत पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले.
धर्म, संस्कृती आणि कर्तव्यभावना यांचा सुंदर मिलाफ घडवणारा हा सोहळा पाहण्यासाठी परिसरात शांत, भक्तिमय वातावरण पसरले होते. पोलीस दलातील सर्व कर्मचारी एकजुटीचे आणि सामाजिक सामंजस्याचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले.
Comments
Post a Comment