Posts

पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार व पोलीस कर्मचारी यांचा पाचोरा शहरातून पायी रांऊड....! शेवटी एकच "वादा" अन् पोलिसच "दादा"....!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी: पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार व पोलीस कर्मचारी यांचा पाचोरा शहरातून पायी फेरफटका....   पाचोरा पोलीस स्टेशनला नुकतेच तीन दिवसापूर्वी नवीन रुजू झालेले तरुण तडफदार रुबाबदार व डॅशिंग पोलीस अधिकारी श्री राहुल कुमार पवार यांनी पहिल्या दिवसापासून पाचोरा शहरात गुन्हेगारावर वचक बसण्यासाठी कारवाई मोहीम सुरू केली असून अनेक गुन्हेगारांनी आपले बिस्तर आवरून चांगल्या कामाकडे वळू लागले पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी पहिल्याच दिवशी रात्री अकरानंतर फिरणाऱ्यावर कारवाई चालू केली असून तसेच ट्रिपल सीट विना कागदपत्र विना लायसन तसेच स्पीड मध्ये गाड्या चालविणे किंवा कर्कश आवाज करून गाडी जोरात चालवणे यावर सुद्धा त्यांनी नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न चालू असून यापुढे कोणीही रात्री अकरानंतर फिरून आहे तसेच गाड्यांचे कागदपत्र व लायसन्स सोबत बाळगणे व कुठलेही मोटर वाहन स्पीड मध्ये चालू नव्हे अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच शहरात गुन्हेगारी व दहशत निर्माण करणाऱ्या वर योग्य ती कार...

पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात सन्मानिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गृहोपयोगी भांडी संच वाटप नुकतेच आषाढी एकादशीला संपन्न...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)   पाचोरा प्रतिनिधी:-  दिनांक ३१ मे २०२५ रोजी मारोती मंदिर, कृष्णापुरी* येथे बांधकाम कामगारांची सेफ्टी किट (पेटी) संच व गृह उपयोगी भांडे संचासाठी ऑनलाईन नोंदणी झाली होती. तसेच कृष्णापुरी भागातील बांधकाम कामगारांनी इतर ठिकाणी केलेल्या नोंदणींचेही *भांडे वाटप कार्यक्रम  दिनांक ६ जुलै, रविवार* रोजी सकाळी १०.०० वाजता मारोती मंदिर, कृष्णापुरी येथे संपन्न झाला.      सन्माननीय आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यासाठी प्रदीप वाघ, मयुर महाजन,सुरज शिंदे, संतोष महाजन, रविंद्र पाटील, सुदर्शन सोनवणे,शरद गिते, हेमंत चव्हाण, प्रशांत धनगर, कन्हैया देवरे, सुनंदाताई महाजन, सुनील महाजन, मयुर चव्हाण, गणेश पाटील व आदींनी परिश्रम घेतले.

माझा प्रभाग, माझी जबाबदारी" या संकल्पनेखाली पाचोरा शहरात मलेरिया मुक्तीची सुरुवात... आमदार किशोर आप्पा पाटील व जनसेवक बंडु भाऊ तसेच पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या सहकार्याने करण्यात आली...!

Image
               (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:- "माझा प्रभाग, माझी जबाबदारी" या संकल्पनेखाली पाचोरा शहरात मलेरिया मुक्तीची सुरुवात करण्यात आली आहे! पाचोरा शहरात सध्या पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रोगजंतू आणि मलेरिया सारख्या आजारांचा धोका अधिकच वाढला आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी पाचोरा नगरपालिकेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आमदार कार्यसम्राट आदरणीय किशोर आप्पा पाटील यांच्या प्रेरणेने, तसेच जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या सूचनेनुसार, प्रभाग क्रमांक ८ मध्ये मलेरिया नाशक लिक्विड औषधाची फवारणी मोहिमेची सुरुवात झाली आहे. या उपक्रमासाठी मुख्याधिकारी व प्रशासक मंगेश देवरे साहेब, आरोग्य निरीक्षक नकवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने विशेष मोहीम राबवली. 🚿 कसे करण्यात येत आहे काम? 🔹 शहरातील सांडपाणी, साचलेले डबके, पावसामुळे तयार झालेल्या पाण्याच्या ठिकाणी मलेरिया नाशक औषध टाकले जात आहे. 🔹 विशेषतः प्रभाग क्रमांक ८ मधून याची सुरुवात करण्यात आली. 🔹 या मोह...

वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांचा उल्लेखनीय कार्यगौरव – चार प्रशंसापत्रांनी सन्मान...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांनी आपल्या अचूक तपासकौशल्याने आणि कार्यतत्परतेने पोलीस खात्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना चार वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या यशस्वी उकलासाठी पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडून प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले आहे. 🔹 प्रथम प्रशंसापत्र: अंतर्गत कलम 109, 310, 132, 121 भादंवि अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना संदीप पाटील यांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन महत्त्वाचे पुरावे गोळा केले. गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. 🔹 द्वितीय प्रशंसापत्र: सप्टेंबर 2023 मध्ये घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 4 दिवसांत यशस्वी उलगडा करण्यात आला. या कारवाईत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासातून आणि सखोल चौकशीतून आरोप ठामपणे सिद्ध केले. 🔹 तृतीय प्रशंसापत्र: स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने एका प्रलंबित गुन्ह्याचा निकाल लावत, आरोपीला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे तपासादरम्यान स्...

दिशा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मुख्याध्यापक व शिक्षक बैठक सन 2025/26 रोजी संपन्न...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) दोंडाईचा प्रतिनिधी: दिनांक 04/07/2025, वार शुक्रवार रोजी,जिल्हा धुळे , जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांची शैक्षणिक वर्ष सन 2025 / 26 ची जय वकील फाउंडेशन (मुंबई )अंतर्गत दिशा अभियान जिल्हास्तरीय मुख्याध्यापक / स्कुल ॲडमिन व विशेष शिक्षक बैठक अत्यंत उत्साहाने   पार पडली .दिशा अभियानला सुरू होऊन सहा वर्षे झाली सातव्या वर्षात दिशा अभियानने पदार्पण करून सर्व बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रगतिशील अभ्यासक्रम तयार करून सर्व विशेष शिक्षकांना एक मोठे गिफ्ट दिलेले आहेत .तसेच बैठकीमध्ये तीनही जिल्ह्यांमधून एकूण 11 शाळांना दिशा अंमलबजावणी सर्टिफिकेट धुळे जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माननीय श्री एम एल पावरा साहेब यांच्या हस्ते आणि दिशा अभियान राज्य समन्वयक माननीय श्री निलेश चव्हाण सर व दिशा टीम यांच्या हस्ते मिळाले .त्या अकरा शाळांमध्ये आमच्या संस्थेच्या Late.K. Patil Residency matimand Vidyalay dondaicha, dis -Dhule, व Late.Taterav Patil Residency matimand vidyalaya morane,dis - Dhule या दोन...

पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार साहेब यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनाकागदपत्रे व लायसन्स नसलेल्या तसेच ट्रिपल सीट असलेल्या वाहन चालकांवर कारवाई सुरू...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल),  (शब्दांकन:-अनिल आबा येवले)  पाचोरा प्रतिनिधी  पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार साहेब यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनाकागदपत्रे व लायसन्स नसलेल्या तसेच ट्रिपल सीट असलेल्या वाहन चालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे  पाचोरा येथे नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विनापरवाना कागदपत्र नसलेले नंबर प्लेट असलेले अल्पवयीन गाड्या चालवणारे तसेच ट्रिपल सीट असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू केली असून तरी नागरिकांनी कागदपत्र लायसन्स सोबत बाळगणे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे श्री राहुल पवार साहेब यांनी  सांगितले आहे. मोहीम सुरू झाली असून यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश बदाने साहेब श्री संजय निकुंभ साहेब श्री कैलास ठाकूर साहेब श्री सुनील पाटील साहेब तसेच पोलीस कर्मचारी यांनी कारवाई मोहीम चालू केली असून ही मोहीम कायमस्वरूपी चालू राहील तरी नागरिकांनी सहकार्य करावे.

नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे नवी मुंबई येथे एकादशीनिमित्त विविध दिंडीचे आयोजन...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (नवी मुंबई प्रतिनिधी):- नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे नवी मुंबई येथे आषाढी एकादशीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त विविध दिंडीचे आयोजन करण्यात आले. यात दिंडी साक्षरतेची , दिंडी स्वच्छतेची , दिंडी वारकरी यांची , दिंडी वृक्षारोपणाची यांचा समावेश होता. शाळेतून सकाळी प्रभात फेरीचे निमित्ताने वरील दिंड्यांचे सुविचार बॅनर विद्यार्थ्यांच्या हातात देऊन तसेच विठ्ठल रुक्माई  , ओला कचरा सुका कचरा यांची पालखी विद्यार्थ्यांच्या हातात देऊन , लेझीम पथकाच्या माध्यमातून महापे गावातून प्रभात फेरीचे आयोजन केले व यातून वरील दिंडींचे घोषणा देऊन समाज प्रबोधन करण्यात आले. या दिंडीचे संपूर्ण नियोजन नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 चे मुख्याध्यापक दिपक नामदेव बडगुजर यांनी केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या दिंडीच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सारिका पाटील , महादेव तोंडे ...