दिशा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मुख्याध्यापक व शिक्षक बैठक सन 2025/26 रोजी संपन्न...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा प्रतिनिधी:
दिनांक 04/07/2025, वार शुक्रवार रोजी,जिल्हा धुळे , जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांची शैक्षणिक वर्ष सन 2025 / 26 ची जय वकील फाउंडेशन (मुंबई )अंतर्गत दिशा अभियान जिल्हास्तरीय मुख्याध्यापक / स्कुल ॲडमिन व विशेष शिक्षक बैठक अत्यंत उत्साहाने   पार पडली .दिशा अभियानला सुरू होऊन सहा वर्षे झाली सातव्या वर्षात दिशा अभियानने पदार्पण करून सर्व बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रगतिशील अभ्यासक्रम तयार करून सर्व विशेष शिक्षकांना एक मोठे गिफ्ट दिलेले आहेत .तसेच बैठकीमध्ये तीनही जिल्ह्यांमधून एकूण 11 शाळांना दिशा अंमलबजावणी सर्टिफिकेट धुळे जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माननीय श्री एम एल पावरा साहेब यांच्या हस्ते आणि दिशा अभियान राज्य समन्वयक माननीय श्री निलेश चव्हाण सर व दिशा टीम यांच्या हस्ते मिळाले .त्या अकरा शाळांमध्ये आमच्या संस्थेच्या Late.K. Patil Residency matimand Vidyalay dondaicha, dis -Dhule, व Late.Taterav Patil Residency matimand vidyalaya morane,dis - Dhule या दोन्ही शाळेंचा समावेश आहे आमच्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी हे सर्टिफिकेट मिळाल्याबद्दल ही बाब आम्हाला अभिमानास्पद  आहे .त्याबद्दल सर्व  दिशा टीमचे मनापासून आभार .सर्टिफिकेट मिळालेल्या इतर सर्व शाळांचे अभिनंदन
बैठकीमध्ये दिशा अभियान राज्य समन्वयक मा .श्री निलेश चव्हाण सर , दिशा अभियान नाशिक झोन समन्वयक, मा .श्री अमोल कळम सर आणि मा .श्री अभय रोटे सर यांनी नवीन वर्षामध्ये दिशा पोर्टलवर झालेले काही बदल तसेच अभ्यासक्रमामध्ये इतर मॅन्युअल मध्ये व वर्कबुक मध्ये झालेले बदल अजून एक्स्ट्रा वाढवलेले मॅन्युअल तसेच दिशावार्षिक कॅलेंडरची उजळणी विद्यार्थ्यांची आई पी भरताना स्कोरिंग करताना शिक्षकांनी कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे आणि अचूकपणे विद्यार्थ्यांचे स्कोरिंग करून विद्यार्थ्यांची ध्येय निश्चिती कशा पद्धतीने करावी तसेच वर्गांमधील व्यवस्थापन वेळापत्रक लेसनप्लॅन टास्क एनालिसिस कसे करावे अशा विविध सर्व प्रश्नांवर अत्यंत उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले  .प्रशिक्षणा दरम्यान विविध ऍक्टिव्हिटि शिक्षकांकडून घेऊन शिक्षकांना अजून प्रभावीपणे कसे शिकवता येईल याचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षकांना अभ्यासक्रम घेताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण केले .एकूण सर्व टीमने खूपच उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करून अभ्यासक्रमामध्ये चांगल्या प्रकारे मॉडिफिकेशन करून अजून प्रगतिशील  अभ्यासक्रम तयार केला .व आम्हा शिक्षकांचे शिकवण्याचे कार्य सोपे व प्रभावी केले .त्याबद्दल संपूर्ण दिशा टीमचे पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद आणि यापुढेही दिशा टीमने असेच चांगले मार्गदर्शन करावे आणि सहकार्य करावे ही नम्र विनंती *✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद