नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे नवी मुंबई येथे एकादशीनिमित्त विविध दिंडीचे आयोजन...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(नवी मुंबई प्रतिनिधी):-
नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे नवी मुंबई येथे आषाढी एकादशीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त विविध दिंडीचे आयोजन करण्यात आले. यात दिंडी साक्षरतेची , दिंडी स्वच्छतेची , दिंडी वारकरी यांची , दिंडी वृक्षारोपणाची यांचा समावेश होता. शाळेतून सकाळी प्रभात फेरीचे निमित्ताने वरील दिंड्यांचे सुविचार बॅनर विद्यार्थ्यांच्या हातात देऊन तसेच विठ्ठल रुक्माई  , ओला कचरा सुका कचरा यांची पालखी विद्यार्थ्यांच्या हातात देऊन , लेझीम पथकाच्या माध्यमातून महापे गावातून प्रभात फेरीचे आयोजन केले व यातून वरील दिंडींचे घोषणा देऊन समाज प्रबोधन करण्यात आले.
या दिंडीचे संपूर्ण नियोजन नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 चे मुख्याध्यापक दिपक नामदेव बडगुजर यांनी केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या दिंडीच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सारिका पाटील , महादेव तोंडे  ,संध्या झाकणे व शिक्षकेतर कर्मचारी विकी मोरे , मंदा पिंगळे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद