Posts

दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी बांबरुड राणीचे येथे प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) राणीचे बांबरुड (पाचोरा): दि.3 डिसेंबर 2024 रोजी बांबरुड राणीचे येथे प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने प्रहार संघटनेचे शाखा प्रमुख विजय श्रीराम पवार मल्यार्पण करून दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपाध्यक्ष राजू अर्जुन निकम सचिव अविनाश भास्कर दारकोंडे सल्लागार माधवराव रामदास सोनवणे खजिनदार सचिन लखु काळे सदस्य जितेंद्र साळुंखे ग्रामस्थ प्रदीप अशोक आढाव श्री संभाजी हसरत पाटील, सुनील लक्ष्मण पवार, दादाभाऊ कोकणे, रमेश देसाई आणि गावातील दिव्यांग बंधु-भगिणी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                तसेच प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत बांबरुड राणीचे यांना शासन निर्णयानुसार शासनाने ठरवून दिलेल्या योजनांचा लाभ त्वरित मिळावा त्याविषयाचे निवेदन शाखा प्रमुख विजय श्रीराम पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

पाचोर्यात जागतिक एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) आज  दि. 2 डिसेंबर २०२४ रोजी जागतिक एड्स दिना निमित्त आय.सी.टी.सी. विभाग ग्रामीण रुग्णालय पाचोरा व साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि डॉ.वाय. पी.युवा  फाउंडेशन एन.जी.ओ. खडकदेवळा बु. व गो.से.हायस्कूल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई इतर भागात एच.आय.व्ही.एड्स जनजागृतीपर अभियान रॅली काढण्यात आली  गो.से. हायस्कूल पाचोरा चे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जागृती रॅली सहभाग घेतला एच.आय.व्ही.एड्स जनजागृतीपर  जागतिक एड्स दिना विषेश महत्व, एचआयव्ही म्हणजे काय? एचआयव्ही व एड्स यातील फरक, एचआयव्ही होण्याची प्रमुख कारने कोणती? विशेष घाव्याची काळजी, समाजातील गैरसमज,उपचार व एचआयव्ही बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व मुद्यांवर ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील समुपदेशक श्रीमती लता चव्हाण व प्रयोगशाळा तंत्रज्ञ  श्री.श्रीकांत भोई यांनी माहिती मार्गदर्शन केले तसेच  सर्व उपस्थितांनी शपथ घेतली. सदर कार्य...

आरोटे ह्यांच्या कडून सत्कार!पत्रकार हितासाठी स्वतंत्र महामंडळ: फडणवीस यांचा सत्कार सोहळा!पत्रकार संघाच्या मागण्यांना यश: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे फडणवीस यांचा सत्कार!

Image
पत्रकारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकारच्या निर्णया बद्दल: मा.देवेंद्र फडणवीस यांचा डॉ. विश्वासराव  (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) महाराष्ट्र सरकारने पत्रकारांसाठी व स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णय घेतल्या बद्दल महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फडणवीस यांना साईबाबांची मूर्ती, खारीक-खोबऱ्याचा हार, डायरी, घड्याळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कार समारंभात पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे किरण जोशी.सोशल मिडिया प्रमुख सिध्दार्थ भोकरे रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे.सिंधुदुरग  जिल्हा अध्यक्ष प्रसन्न गोंदवले.नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील, अकोले तालुका कार्...

सेवा गृप नाशिक यांच्या वतीने समाज सेवा कार्याचा वसा घेऊन 5 व्या वर्षात यशस्वी वाटचाल करून पदार्पण...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)        सेवा गृप नाशिक यांच्या वतीने समाज सेवेचा वसा घेऊन या महिण्यात दिवाळीचे मुहूर्त साधत ज्यांना दोन वेळेला जेवणाची कमतरता आहे अशा तीस (30) गरजू कुटूंबांना रेशन किट आणि मिठाई बाँक्सचे वाटप करून गरजूंचा चेहरावरचा आनंद दिसत होता तो पाहून आमचा आनंदही गगनात मावत नव्हता, जेवढा  त्यांना आनंद झाला तेवढाच आम्हालाही अन्नधान्य किट आणि मिठाई देतांना झाला. या गृपच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम राबवून आता पर्यंत शाळेत लागणारे अनेक शालेय साहीत्य वाटप, विद्यार्थ्यांना फुड्स पाँकीट वाटप, हिवाळ्यात  गरिबांना मोफत ब्लँकेट वाटप, पावसाळ्यात वृध्दांना छत्री वाटप, अबोल पशुंना चारा छावण्या, वृध्दाश्रम, अनाथाश्रमात कुठल्याही प्रकारचे साहाय्य करणे, उन्हाळ्यात झाडांना पाण्याची कमतरता पडते म्हणून वृक्षावल्ली फाऊंडेशनला पाईप देऊन त्यांना सहकार्य करणे, असे एक ना अनेक कामे सेवा गृपच्या साहाय्याने ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना साहाय्य करणे, थोडक्यात सांगायचे झाले तर ज्यांना जे काही अन्न,वस्र आणि निवारा या अशा प्रकारे एक...

गिरीश महाजन यांची सलग सात वेळा आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न.लोहारा विविध कार्यकारी चेअरमन ,संचालक मंडळ,तसेच भारतीय जनता पार्टी व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचा संयुक्त उपक्रम.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते ना.गिरीश महाजन यांची सलग सातवेळा आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन,व्हा चेअरमन संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थ मंडळी व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५७ रुग्णांनी नाव नोंदणी करून मोफत तपासणी केली. यामधील १०८ रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे दिनांक ४ डिसेंबरला पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आयोजक शरद अण्णा सोनार (भाजपा लोहारा कुऱ्हाड गटप्रमुख.) यांनी दिली. या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग एन्जिओग्राफी एन्जोप्लास्टी तपासणी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी,नाक,कान,घसा, मोतीबिंदू तसेच तिरडेपणा, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मुतखडा, अशा विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांना मोफत मेडिकल गोळ्या औषधी देण्यात आले. हे आ...

पाचोरा येथील देशमुख वाडीतील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्री अंकुर अनिल झंवर यांच्या हॉस्पिटल ला सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तपासणीला आलेल्या पेशंटांना देण्यात आले गिफ्ट

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  पाचोरा येथील देशमुख वाडीतील सर्वांचे परिचित असलेले मनमिळाऊ स्वभावाचे व अत्यंत गोड बोलणारे श्री डॉक्टर अनिल झंवर यांचे वडील स्वर्गीय डॉक्टर श्री एस आर झंवर यांनी शिक्षण घेऊन 1954 यावर्षी यांनी पाचोरा भडगाव जामनेर या तीन तालुक्यातील एकमेव एमबीबीएस डॉक्टर म्हणून पदवी घेऊन तीन तालुक्याचा नावलौकिक केली होत तसेच त्यांना एम ए सर्जन म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती पण त्यांची घरची साधारण परिस्थिती असल्यामुळे त्यांनी 1957 यावर्षी पाचोरा येथेच आपल्या राहत्या घरी छोटासा दवाखाना सुरू केला होता त्यांची परंपरा आज त्यांचे चिरंजीव व नातू करीत आहे चिरंजीव डॉक्टर श्री अंकुर झंवर यांनी आपले शिक्षण मुंबई येथे एमबीबीएस एमडी डीएनबी करून स्पेशल हृदयरोग तज्ञ म्हणून सेवा करण्याचा निर्धार केला त्यासाठी त्यांनी मोठ्या शहरात हॉस्पिटल न टाकता आपले आजोबा व वडील यांनी पाचोरा शहरासाठी दिलेले योगदान व सेवा या साठी त्यांनी सुद्धा पाचोरा येथेच आपल्या राहत्या घराजवळ देशमुख वाडी येथे हॉस्पिटल टाकण्याचा मानस केला व त्यांनी देशमुख वाडी येथे तीन वर्षांपूर्व...

लोहारा येथे फॅमिली हेल्थ कार्ड सभासद नोदणी शिबिराला प्रतिसाद..समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने माणुसकी रुग्णसेवा समूह व छत्रपती शाहू महाराज संस्था यांचा स्तुत्य उपक्रम

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज) लोहारा तालुका पाचोरा येथे मजूर शेतकरी गरुड नागरिकांना फॅमिली कार्डचे सभासद नोंदणी शिबीर माणुसकी रुग्ण सेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले. शिबिराचा 250 सभासदांनी लाभ घेतला. फॅमिली हेल्थ कार्डमुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलामध्ये 20 ते 50 टक्के पर्यंत सभासदांना सूट मिळणार आहे त्यात ओपीडी,सोनोग्राफी,रक्त तपासणी,अतीदक्षता उपचार आधी समाविष्ट केले आहे.. माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष गरिबांचे सिंघम म्हणून ओळख असलेले तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोहारा येथे शिबिर लावण्यात आल्याचे छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाश एस आर के यांनी सांगितले.   कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती पूजनाने झाली यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व ज्येष्ठ नागरिक प्रभाकर चौधरी, आ.आ.पटेल , विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ.सागर गरुड, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ केयू...