Posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे डॉ शिवाजी शिंदे यांचा सत्कार

Image
  (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार) पाचोरा : येथील सा. ग्लोबल महाराष्ट्र चे संपादक तथा लेखक व कवी प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांनी निसर्गोपचार शास्त्रातील ॲक्युपंक्चर विषयात पी. एचडी. संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अध्यक्ष किशोर रायसाकडा, ज्येष्ठ पत्रकार अनिल येवले (दक्ष पोलीस टाइम्स प्रतिनिधी), यांनी शाल, सनमानाचिन्ह, पुष्पगुच्छ यासोबतच ट्रॅक सूट, व घड्याळ देऊन त्यांना सन्मानित केले. याप्रसंगी माणिक राजे पवार विश्वासराव ट्रस्टचे विश्वस्त प्रा रवींद्र चव्हाण, प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल, धनराज धनगर, प्रा.प्रतिभा परदेशी, प्रा. अंकिता देशमुख, प्रा. संगीता राजपूत, प्रा. प्रतिभा पाटील, व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

आज पाचोरा तहसील कार्यालयात प्रांताधिकारी साहेब,न.पा. मुख्याधिकारी साहेब,,तसेच तहसिलदार साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.!

Image
    (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार)प्रांत अधिकारी श्री भूषण अहिरे साहेब व तहसीलदार साहेब श्री विजय बनसोडे साहेब यांनी तहसील ऑफिस ची संपूर्ण इमारती पाहणी केली असता इमारतीला नाविन्यपूर्ण बनवून साधारणतः दहा ते पंधरा वर्षे झाली असता त्या इमारतीची स्वच्छता झालेली नव्हती प्रत्येक रूमला धुळ मुळे घाण झालेली असता तात्काळ प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे साहेब व तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब यांनी सूचना केल्या की संपूर्ण तहसील ऑफिस ची स्वच्छता करून आपल्या कार्यालयाची शोभा वाढवावी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व महिलांना तहसील ऑफिस व कार्यालय स्वच्छ दिसले पाहिजे याकरिता लागलीच नायब तहसीलदार आप्पासो‌.श्री.विनोद कुमावत साहेब, श्री जितेन्द्र धनराळे साहेब व भाऊसाहेब श्री अभिजित येवले,यांनी लागलीच पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे साहेब यांच्याशी संपर्क करून नगरपालिकेचे पाण्याचे टँकर मागवले व काही सफाई कामगार यांच्याकडून संपूर्ण इमारतीची पाणी ने धुवून व झाडू मारून स्वच्छता केली तसेच प्रत्येक रूम मध्ये स्वच्छता केली यावेळी तहसीलचे सर्व कर्मचारी यांनीही सफाई कर्मचाऱ्यांना ...

प्रा. डॉ. शिवाजी शिंदे सर यांचा गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे सत्कार

Image
   (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार)    पाचोरा- येथील मिठाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातील आदर्श शिक्षक तथा प्रा. शिवाजी शिंदे सर यांचा गिरनाई शिक्षण संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. प्रा. शिवाजी शिंदे सर यांनी *निसर्गोपचार शास्त्रामध्ये ॲक्युप्रेशर* या विषयात डॉक्टरेट  (P.hd.) ही पदवी संपादन केल्याबद्दल  गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव च्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल कै. पि के शिंदे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्ही गीते सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी उपाध्यक्ष भैय्यासाहेब जे डी काटकर व एस व्ही गीते यांनी आपली मनोगते मांडली .मुख्याध्यापक सु ना पाटील ,समाधान महाजन ,जी व्ही सोमवंशी ,महेश देशमुख , यांच्यासह संस्थेच्या सर्व कर्मचारी उपस्थित होते.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत टोणपे व आभार बाळू पवार यांनी व्यक्त केले.

पाच वर्षाच्या कालखंडात स. न. १९७०चे पाझर तलाव ओसांडले....बरड्या राणचे जंगलाची बागायती बहरणार!

Image
         (कजगाव ग्रामीण प्रतिनिधी प्रल्हाद उर्फ अप्पासाहेब पवार) जलसाठ्यामुळे अर्धा तांदुळवाडी शिवार, भोरटेक शिवार, पिंपरी व उंबरखेड शिवार या शिवारांचे मुरमाट जमिनीतून प्रोकुलेशन होऊन या शिवारांना मोठा फायदा होणार....!            तांदुळवाडी तालुका भडगाव येथील भोरटेक, तांदुळवाडी, मळगाव या तिघी गावांच्या संगमात असणारे सन १९७०च्या पाझर तलाव भरल्याने शेतकरी निराश असून परिसरात बागायती भरणार.            साधारणतः सन१९७०च्या दुष्काळी कालखंडात तांदुळवाडी पाझर तलावाचे काम झाले असून ते स्व. नारायण केशव पाटील माझी जिल्हा परिषद सदस्य व ३५ वर्ष तांदुळवाडी गावात आपला दबदबा सरपंच पदाचा ठसा भडगाव तालुक्यात दिसून आला होता ,संपूर्ण महाराष्ट्रात देखील नावलौकिक होते ,अशा थोर महान सरपंच व त्यांच्या साथीदारांनी लघु पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून जबरदस्त दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या तांदुळवाडी पाझर तलावाचे काम २ ते ३ वर्षात पूर्ण करून त्या पाझर तलावाचा पिंपरी, भोरटेक, उंबरखेड, तांदुळवाडी या गावांना प्रकुलेशन होऊ...

एम एम महाविद्यालयातील मैदानावर शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेंना सुरुवात

Image
पाचोरा प्रतिनिधी  दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी 17 वर्षा आतील मुले व मुली शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या सदर स्पर्धा या एस एस एम एम कॉलेज पाचोरा यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे याबाबत अधिक असे की जिल्हा क्षेत्रात सुरू असलेल्या शासकीय शालेय स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि त्यातीलच व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान हा एस एस एम एम कॉलेज पाचोरा यांना मिळाला दिनांक 19 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन व्हा चेअरमन नानासो व्ही टी जोशी संचालक डॉ जयवंत पाटील , क्रीडा अधिकारी डॉ सुरेष थरकूडे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा जी बी पाटील पर्यवेक्षक प्रा एस एस पाटील क्रीडा समनव्यक व क्रीडा शिक्षक प्रा गिरीष पाटील , डि एन पाटील सर धरणगाव , गिरीष पाटील सर जामनेर व इतर मान्यवरांच्या हस्ते व्हॉलीबॉल मैदानाचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात केली सदर स्पर्धेत जवळजवळ 15 मुलांचे व 15 मुलींचे संघ सहभाग नोंदवीला सदर स्पर्धेत जिल्हा भरातील शाळांनी उत्कृष्ट प्रतिसाद नोंदविला सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच म्हणून निलेश कुलकर्णी , प्रफुल्ल पाटील , स्वप्न...

तांदुळवाडी चा रेल्वे बोगदा एक महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान ..

Image
तांदुळवाडी  कजगाव ग्रामीण प्रतिनिधी प्रल्हाद पवार     शेतकऱ्यांचे कपाशी काढणीनंतर होणार हाल., माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान... तांदुळवाडी येथील रेल्वे बोगदा गेल्या एक महिन्यापासून बंद करण्यात आल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांसह देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रेल्वे पटरी दररोज ओलांडावा लागत आहे, तांदुळवाडी वडाळा मार्गावरील बोगदा बनवण्यास आला आहे, या मार्गावर साधारणता 20 ते 25 गावांचा संपर्क असल्याने या गावांचे दळणवळण संपूर्ण बंद झाले आहे. भुसावळ ते नाशिक तिसऱ्या रेल्वे लाईन चे काम सुरू असून तांदुळवाडी येथील रेल्वे बोगदा गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आला असल्याने हा बोगदा बंद असल्यामुळे मळगाव येथून तांदुळवाडी च्या विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या 70 ते80 विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. विद्यार्थी वर्ग जीव मुठीत घेत रेल्वे पटरी ओलांडून सर्व विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, तांदुळवाडी शिवार व मडगाव शिवार तसेच वडाळा शिवार या शेतकऱ्यांचे 70 ते 75 टक्के शेती रेल्वेच्या पलीकडे असल्याने शेतकऱ्यांच...

कजगाव तांदुळवाडी फाट्यावरून एसटी बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे व प्रवाश्यांचे अतोनात हाल

Image
तांदुळवाडी  ता. भडगाव प्रतिनिधी....    तांदुळवाडी चा रेल्वे बोगदा एक महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान ..  *शेतकऱ्यांचे कपाशी काढणीनंतर होणार हाल., *माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान... तांदुळवाडी येथील रेल्वे बोगदा गेल्या एक महिन्यापासून बंद करण्यात आल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांसह देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रेल्वे पटरी दररोज ओलांडावा लागत आहे, तांदुळवाडी वडाळा मार्गावरील बोगदा बनवण्यास आला आहे, या मार्गावर साधारणता 20 ते 25 गावांचा संपर्क असल्याने या गावांचे दळणवळण संपूर्ण बंद झाले आहे. भुसावळ ते नाशिक तिसऱ्या रेल्वे लाईन चे काम सुरू असून तांदुळवाडी येथील रेल्वे बोगदा गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आला असल्याने हा बोगदा बंद असल्यामुळे मळगाव येथून तांदुळवाडी च्या विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या 70 ते80 विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. विद्यार्थी वर्ग जीव मुठीत घेत रेल्वे पटरी ओलांडून सर्व विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, तांदुळवाडी शिवार व मडगाव शिवा...