आज पाचोरा तहसील कार्यालयात प्रांताधिकारी साहेब,न.पा. मुख्याधिकारी साहेब,,तसेच तहसिलदार साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.!

    (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार)प्रांत अधिकारी श्री भूषण अहिरे साहेब व तहसीलदार साहेब श्री विजय बनसोडे साहेब यांनी तहसील ऑफिस ची संपूर्ण इमारती पाहणी केली असता इमारतीला नाविन्यपूर्ण बनवून साधारणतः दहा ते पंधरा वर्षे झाली असता त्या इमारतीची स्वच्छता झालेली नव्हती प्रत्येक रूमला धुळ मुळे घाण झालेली असता तात्काळ प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे साहेब व तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब यांनी सूचना केल्या की संपूर्ण तहसील ऑफिस ची स्वच्छता करून आपल्या कार्यालयाची शोभा वाढवावी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व महिलांना तहसील ऑफिस व कार्यालय स्वच्छ दिसले पाहिजे याकरिता लागलीच नायब तहसीलदार आप्पासो‌.श्री.विनोद कुमावत साहेब, श्री जितेन्द्र धनराळे साहेब व भाऊसाहेब श्री अभिजित येवले,यांनी लागलीच पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे साहेब यांच्याशी संपर्क करून नगरपालिकेचे पाण्याचे टँकर मागवले व काही सफाई कामगार यांच्याकडून संपूर्ण इमारतीची पाणी ने धुवून व झाडू मारून स्वच्छता केली तसेच प्रत्येक रूम मध्ये स्वच्छता केली यावेळी तहसीलचे सर्व कर्मचारी यांनीही सफाई कर्मचाऱ्यांना मदत केली स्वच्छ घर सुंदर घर ही संकल्पना गृहीत धरून श्री भूषण अहिरे साहेब व श्री विजय बनसोडे साहेब यांनी सुंदर ऑफिस सुंदर कार्यालय अशी संकल्पना राबवून संपूर्ण तहसील इमारत स्वच्छ केली या स्वच्छतेमुळे तहसील ऑफिसला आनंदी वातावरण असून सर्व कर्मचारी अधिकारी यामुळे आनंदी झाले या स्वच्छते मोहिमेसाठी प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे साहेब तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब यांनी सहकार्य केले तसेच नायब तहसीलदार  आप्पासो श्री विनोद कुमावत ,श्री जितेंद्र धनराळे साहेब,व भाऊसाहेब अभिजित येवले,यांनी सुद्धा सहकार्य केले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..