तांदुळवाडी चा रेल्वे बोगदा एक महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान ..

तांदुळवाडी  कजगाव ग्रामीण प्रतिनिधी प्रल्हाद पवार 
   शेतकऱ्यांचे कपाशी काढणीनंतर होणार हाल.,
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान...
तांदुळवाडी येथील रेल्वे बोगदा गेल्या एक महिन्यापासून बंद करण्यात आल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांसह देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रेल्वे पटरी दररोज ओलांडावा लागत आहे,
तांदुळवाडी वडाळा मार्गावरील बोगदा बनवण्यास आला आहे, या मार्गावर साधारणता 20 ते 25 गावांचा संपर्क असल्याने या गावांचे दळणवळण संपूर्ण बंद झाले आहे. भुसावळ ते नाशिक तिसऱ्या रेल्वे लाईन चे काम सुरू असून तांदुळवाडी येथील रेल्वे बोगदा गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आला असल्याने हा बोगदा बंद असल्यामुळे मळगाव येथून तांदुळवाडी च्या विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या 70 ते80 विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. विद्यार्थी वर्ग जीव मुठीत घेत रेल्वे पटरी ओलांडून सर्व विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, तांदुळवाडी शिवार व मडगाव शिवार तसेच वडाळा शिवार या शेतकऱ्यांचे 70 ते 75 टक्के शेती रेल्वेच्या पलीकडे असल्याने शेतकऱ्यांचे हे देखील महिन्यापासून मोठे अतोनात नुकसान होत आहे, एक महिन्याच्या कालावधीमध्ये बैल जोडी खत घेऊन जात येत नाही ह्या कारणामुळे शेतात रासायनिक खते देखील शेतकऱ्यांनी शेतात टाकले नसले कारणाने शेतकरी वर्गांना  उत्पादनात मोठा फटका बसेल, शेतात जायचं असेल तर साधारणतः दहा ते पंधरा किलोमीटर अंतर कापून शेतकऱ्यांना अशा अडचणींना दररोज सामोरे जावे लागत आहे,
विद्यार्थ्यांचे मनोगत-
आम्ही मळगाव येथून तीस विद्यार्थिनी तांदुळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असल्याने आम्हाला माध्यमिक विद्यालय मार्फत दररोज स्कूल बस असल्याने साधारणता एक महिन्यापासून बोगद्याचे काम चालू असल्याकारणाने आम्हा मुलींना आता दररोज रेल्वे पटरी ओलांडावात असल्याकारणाने अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही.. आम्ही विद्यार्थिनी काही झाल्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील याची खबर घ्यावी . आमच्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार मा, स्मिताताई वाघ यांनी त्वरित विद्यार्थी वर्गांचा व शेतकऱ्यांचा समस्या सोडवाव्या अशी मागणी परिसरातून होत आहे,
विद्यार्थिनी माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी.
भारती माणिक पाटील,( मळगांव )
शेतकऱ्यांचे मनोगत...
आमच्या गावातील शेतकऱ्यांची शेती 60 ते 70 टक्के शेती रेल्वेच्या पलीकडे असल्याने एक महिन्याच्या कालखंडात ना बैल जोडी, नामजूर, ना शेतात रासायनिक खते, कुठलेही सुविधा नसल्याकारणाने आम्हा शेतकऱ्यांना या बोगद्यामुळे मोठा आढा बसलेला आहे, तरी रेल्वे प्रशासनाने त्वरित शेतकऱ्यांसाठी पर्याय व्यवस्था काढावी..
श्री, तुकाराम दगा मोरे आदर्श शेतकरी (तांदुळवाडी )

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..