प्रा. डॉ. शिवाजी शिंदे सर यांचा गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे सत्कार


   (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार)    पाचोरा- येथील मिठाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातील आदर्श शिक्षक तथा प्रा. शिवाजी शिंदे सर यांचा गिरनाई शिक्षण संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
प्रा. शिवाजी शिंदे सर यांनी *निसर्गोपचार शास्त्रामध्ये ॲक्युप्रेशर* या विषयात डॉक्टरेट  (P.hd.) ही पदवी संपादन केल्याबद्दल  गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव च्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल कै. पि के शिंदे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्ही गीते सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी उपाध्यक्ष भैय्यासाहेब जे डी काटकर व एस व्ही गीते यांनी आपली मनोगते मांडली .मुख्याध्यापक सु ना पाटील ,समाधान महाजन ,जी व्ही सोमवंशी ,महेश देशमुख , यांच्यासह संस्थेच्या सर्व कर्मचारी उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत टोणपे व आभार बाळू पवार यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद