ज्येष्ठ पत्रकार अनुपकुमार भार्गव यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली!
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज नागपूर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नागपूर विदर्भ अध्यक्ष तथा दैनिक पुलगाव टाइम्सचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार स्व. अनुपकुमार भार्गव यांचे नुकतेच नागपूर येथे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्री स्व. पार्वतीदेवी यांचेही निधन झाले. या दु:खद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन स्व. अनुपकुमार भार्गव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या कार्यकाळातील अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. विशेषतः ‘दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा’ तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये स्व. भार्गव यांनी वसंतराव मुंडे आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभाग घेतला होता. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी श...