जळगाव जिल्हा काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांचा २२ ते २४ ऑगस्टदरम्यान जिल्हा दौरा
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज
प्रतिनिधी : जळगावजळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे हे प्रदेश अध्यक्ष मा. अनिरुद्ध वनकर व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या सूचनेनुसार दि. २२ ते २४ ऑगस्टदरम्यान जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम भागाचा दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे तसेच माजी प्रदेश सचिव अनिरुद्ध सावळे हे त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. पश्चिम जिल्हा काँग्रेसच्या कार्यक्षेत्रातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून अनुसूचित जाती विभागाचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या निवडीबाबतही पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला जाणार आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक
दि. २२ ऑगस्ट
- चाळीसगाव — सकाळी १० वाजता
- भडगाव — दुपारी २ वाजता
- एरंडोल — सायंकाळी ५ वाजता
दि. २३ ऑगस्ट
- अमळनेर — सकाळी १० वाजता
- धरणगाव — दुपारी २ वाजता
- पारोळा — सायंकाळी ५ वाजता
दि. २४ ऑगस्ट
- पाचोरा — सकाळी १० वाजता
- जळगाव ग्रामीण — सायंकाळी ५ वाजता
या दौऱ्याच्या माध्यमातून अनुसूचित जाती विभागाचे संघटनात्मक जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दौऱ्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांनी केले आहे.
याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बाबा देशमुख व प्रदीप सोनवणे यांनी प्रसिद्ध केले आहे.
Comments
Post a Comment