पाचोरा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मारहाण, अनधिकृत प्रवेश व नुकसानप्रकरणी चार आरोपी दोषी

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा : पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील प्रकरणाचा पाचोरा येथील मा. न्यायालयात २० ऑगस्ट २०२६ रोजी निकाल लागला. मा. न्यायालयीन दंडाधिकारी जी. एस. बोरा मॅडम यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत चार आरोपींना भारतीय दंड संहितेतील विविध कलमांन्वये दोषी ठरविण्यात आले.

पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ४४७, ४५२, ५०४, ५०६ व ४०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादी विजय भाऊसिंग परदेशी यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी रमेश गुलचंद परदेशी व इतर तीन जणांविरुद्ध आरसीसी क्रमांक १४३/२०२२ अन्वये न्यायालयीन कार्यवाही सुरू होती.

सदर प्रकरणात न्यायालयाने आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(२) नुसार दोषी ठरवित, भारतीय दंड संहितेतील कलम १४९, ३२३, ४४७ व ४२७ अन्वये दोष सिद्ध झाल्याचे नमूद केले. तसेच फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून एकूण १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींना चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सोडण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

या खटल्यात एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. या साक्षी व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने संबंधित आरोपींना दोषी ठरविले.

या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल क्रमांक २६२३ अरविंद भोजू मोरे यांनी केला. सरकारी अभियोक्ता म्हणून श्री. चंद्रकांत नाईकवाडे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले, तर मनोज व्ही. माने यांनीही प्रकरणाच्या कामकाजात सहकार्य केले.

मा. एसडीपीओ बापू रोहम, पाचोरा विभाग तसेच पिंपळगाव हरे पोलीस ठाण्याच्या सपोनि. कल्याणी वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाची प्रभावीपणे पैरवी करण्यात आली. पैरवी अधिकारी एचसी ९२० दीपक प्र. पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच केस वॉच म्हणून पोहेकॉ २९०३ विकास सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

पोलीस तपास, प्रभावी पैरवी आणि साक्षी-पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा निकाल लागल्याने संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..