Posts

कर्तृत्वाचा अमृतस्पर्श : नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्यसंधानाचा भव्य उत्सव...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा ( सौ. शितल महाजन ) जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात निखळ योगदान देत उत्तुंग प्रेरणास्थान ठरलेल्या नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्याचा अमृत महोत्सव आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पाचोऱ्यातील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये अत्यंत उत्साही व सन्मानपूर्वक वातावरणात संपन्न होणार आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन म्हणून, तसेच जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक सह ग्राहक चळवळीत सामाजिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नानासाहेब जोशी यांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधून हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील शैक्षणिक, सहकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. नानासाहेब व्ही. टी. जोशी हे पाचोरा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील एक आदरणीय आणि श्रध्दास्थान असलेले नाव. कसे पाहिले तर त्यांनी अष्टपैलू क्षेत्रात कार्य केले आहे आणि प्रत्येक ...

आज दिनांक २६ एप्रिल शनिवारी आमदार किशोर आप्पा पाटील यांची पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी) पाचोरा भडगाव मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांची पुन्हा तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत  भरपुर मतांनी दणदणीत विजय झाला. पाचोरा भडगाव मतदारसंघातील सामाजिक, राजकीय मंडळी, व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा भव्य सत्कार केला. आमदार किशोर आप्पा पाटील यांना त्यांच्या चाहत्यांना अक्षरक्ष: तारीख वेळ द्यावा लागला. आमदार किशोर आप्पा पाटील  यांचे  चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आप्पासाहेब यांना त्यांचे सत्कार सोहळ्याचे कार्यक्रमाला काही अवधीसाठी वेळ देण्यात आले होते.  आज दिनांक २६ एप्रिल  २०२५ रोजी शनिवारी प्रकाश टाॅकीज च्या बाजुला  व जे.डी.सी.बॅंकेच्या समोर आज दिनांक २६ एप्रिल शनिवारी दुपारी ठिक ३:०० वाजता ह्युमन  डेव्हलपमेंट फाऊंडेशन चे  चेअरमन गोकुळ सोनार सर यांच्या हस्ते पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनता जनार्दन यांनी विकासकामांची  भरभरून  मतांच्या रुपाने आ.किशोर आप्पा पाटील यांना पोच पावती देऊन तिसऱ्यांदा भर...

पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी आणि आर्यन ग्रुप यांच्या मदतीने झाली आजी आणि मुलीची भेट

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा प्रतिनिधी)  कालदि 25 एप्रिल रोजी निंबायंती ता सोयगाव येथील आजी धर्माबाई आपल्या मुली सोबत श्री गोविंद समर्थ हॉस्पिटल येथे तपासणी करून घरी निंबायंती येथे परत जाताना एस टी मध्ये चढताना गर्दी असल्याने आजी आणि तिची मुलगी हिची तुटातूट झाली.  सायंकाळी हि गोष्ट पाचोरा डॉक्टर असोसिएशन आणि रोटरी सदस्य डॉ मुकेश तेली,  डॉ प्रतिभा तेली यांना समजताच त्यांनी आर्यन ग्रुपचे आर्यन मोरे यांना बोलावून आजीला शोधणे कामी मदत केली. पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी देखील या कामी मदत केली. अशा रीतीने आजी आणि मुलीची भेट घडवून माणुसकीचे दर्शन पाचोरा रोटरी आणि आर्यन ग्रुप यांनी घडवून आणले. नातेवाईक मंडळी यांनी सर्वांचे आभार मनात आनंद व्यक्त केला

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे मार्फत उत्कृष्ट कार्यालय असा प्रांत कार्यालय पाचोरा चा गौरव...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्वच विषयांत उत्कृष्ट कामकाज केल्या बद्दल जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मार्फत पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी यांना मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिनांक 25 एप्रिल रोजी नियोजन भवन जळगाव येथे सन्मानित करण्यात आला.... 1-: मतदार यादी अदययावत करणे दिनांक 01/01/2024 ते 31/03/2025 पर्यंत 55878 अर्जावर कार्यवाही करण्यात आली. 2-:लोकसभा निवडणूक 2019 मतदान टक्केवारी :- 57.63  विधानसभा निवडणूक 2019 मतदान टक्केवारी :- 63.62  लोकसभा निवडणूक 2024 मतदान  टक्केवारी :- 60.06 विधानसभा निवडणूक 2024 मतदान टक्केवारी :- 68.70 3-: भूसंपादन – NH-753 J- 19 प्रस्ताव 19.06 हे.आर संपादन क्षेत्र-17,43,37,381/- मोबदला वाटप, Railway- 11 प्रस्ताव -20A – अधिसुचना प्रसिध्द, मोबदला वाटप, जुवार्डी, अंचाळगाव-वसंत वाडी, या दोनही प्रस्तावात 3,31,61,587/- रक्कम वाटप करण्यात आली. कजाप- आदेश 33 पारित करणेत आले आहे. 4-: गौण खनिज कारवाई जप्त veh...

भव्य मोफत राज्यस्तरीय अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) आपल्या पाचोरा शहरांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भल्या मोठ्या स्वरूपामध्ये भव्यदिव्य नियोजनामध्ये वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे      आपल्या पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण सेवाभावी मंडळ संचलित लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये येत्या 5 मे ते 15 मे पर्यंत वारकरी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस हा खूप प्रगती करत आहे यांत्रिकदृष्ट्या माणूस हा खूप पुढारलेला असला तरी आपल्या परिवारातील लेकरांना वेळ देण्यात आणि संस्कार देण्यात कुठेतरी अपूर्ण पडत आहे आज मुले मोबाईल संगणक लॅपटॉप च्या आहारी गेले आहेत आई-वडिलांशिवाय मुलं राहू शकतात परंतु मोबाईल शिवाय राहू शकत नाहीत आणि त्यामुळे मुलं डिप्रेशन मध्ये जायला लागलीत चिडचिड करायला लागतात व तसेच आई-वडिलां पासून लांब व्हायला लागले आहेत आणि त्यासाठी मुलांना खरी गरज आहे ती संस्कारांची आणि हीच बाब लक्षात ठेवून आपल्या पाचोरा शहरातील भागवताचार्य योग...

पाचो-यातील प्रसिद्ध "मधुराज डिजीटल" चे संचालक सुनील प्रभाकर सोनार यांचे "कष्टाळू उद्योजक जीवना"ची दखल घेत येत्या "1 में महाराष्ट्र दिना"चे औचित्य साधून होणार सत्कार...!

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) (पाचोरा) आपल्याकडे उद्योजकतेला धैर्य, साहस, बुद्धी, शक्ती' चे प्रतीक मानले गेले आहे. आणि ते कोणत्याही उद्योजकाला तंतोतंत लागू पडते. कारण उद्योग उभा करणं, तो टिकवणं, वाढवणं आणि यशस्वी करण्यासाठी वरील सर्व गुण आवश्यक असतात.   डिजिटल प्रिंट युगात डिजीटल आकर्षक बैनर, लग्नपत्रिका ,बिलबुक, व्हिजीटिंग कार्ड,बायोडाटा,ॲक्रेलिक कटींग,फोर कलर प्रिंटिंग इ.प्रिंट ते पण अगदी वाजवी दरात सांडु भाऊराव काॅम्पेलक्स भडगाव रोड पाचोरा येथे सर्व पंचक्रोशीतील लोकांना प्रचित  सुनील प्रभाकर सोनार यांचा उद्योग  "मधुराज डिजीटल" हा सुरळीतपणे चालू आहे.    पाचोऱ्यासारख्या तालुका पातळीवर आपण अतिशय कष्टाने उद्योग उभा केला आहे. मराठी माणूस उद्योग क्षेत्रात कुठेही कमी नाही, हे सुनील सोनार यांनी दाखवून दिले आहे.  याची दखल घेत दिनांक "1 मे महाराष्ट्र दिना" चे औचित्य साधून आपल्या या यशाचा यथोचित सन्मान व्हावा अशी    प्रातिनिधिक स्वरूपात मे. मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स (पिंपळगावकर) पेढीच्यावतीन...

पाचोर्‍यात रोटरी व डॉक्टर्स तर्फे पहलगाम घटनेचा निषेध..!

Image
पाचोर्‍यात रोटरी व डॉक्टर्स  तर्फे पहलगाम घटनेचा निषेध पाचोरा - येथील पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे पहेलगाम घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या निमित्ताने आज दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता रोटरी व डॉक्टर्स संघटनेतर्फे शहरात शांती पदयात्रा काढून  शासनाला निवेदन देण्यात आले.  येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव व पाचोरा डॉक्टर असोसिएशन तर्फे आज तारीख 25 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांती पदयात्रा काढण्यात आला. पदयात्रे दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शांती पदयात्रा थांबवण्यात आली. या ठिकाणी 22 एप्रिल रोजी मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय पर्यटकांना मेणबत्त्या प्रज्वलित करून व शांती मंत्राचे पठण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पाचोरा प्रांताधिकारी कार्यालय पाचोरा , पोलीस ठाणे व तहसील कार्यालय पाचोरा येथे रोटरी व डॉक्टर असोसिएशन तर्फे पहलगाम घटनेचा निषेध नोंदवणारे निवेदन संयुक्तपणे देण्यात आले. निष्पा...