पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी आणि आर्यन ग्रुप यांच्या मदतीने झाली आजी आणि मुलीची भेट


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)  कालदि 25 एप्रिल रोजी निंबायंती ता सोयगाव येथील आजी धर्माबाई आपल्या मुली सोबत श्री गोविंद समर्थ हॉस्पिटल येथे तपासणी करून घरी निंबायंती येथे परत जाताना एस टी मध्ये चढताना गर्दी असल्याने आजी आणि तिची मुलगी हिची तुटातूट झाली. 
सायंकाळी हि गोष्ट पाचोरा डॉक्टर असोसिएशन आणि रोटरी सदस्य डॉ मुकेश तेली,  डॉ प्रतिभा तेली यांना समजताच त्यांनी आर्यन ग्रुपचे आर्यन मोरे यांना बोलावून आजीला शोधणे कामी मदत केली. पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी देखील या कामी मदत केली. अशा रीतीने आजी आणि मुलीची भेट घडवून माणुसकीचे दर्शन पाचोरा रोटरी आणि आर्यन ग्रुप यांनी घडवून आणले. नातेवाईक मंडळी यांनी सर्वांचे आभार मनात आनंद व्यक्त केला

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..