Posts

बांबरुड राणीचे येथे बॅच सन 2004 गेट टुगेदर मोठ्या उत्साहात साजरे

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)  दिनांक 6 नोव्हेंबर डॉ.राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी 2004 बॅच चे गेट-टुगेदर आयोजन करण्यात आले हा ग्रुप 2018 साली स्थापन झाला होता त्यातून मुलांनी  सर्व गुरु शिक्षक यांना कार्यक्रमाला बोलवून त्याठिकाणी एक छान संकल्पना मार्गदर्शन यावेळी सेवा निवृत्त शिक्षकांनी दिले,त्याचबरोबर सर्व मिळून स्वखर्चाने 10 ग्रीन व्हाईट बोर्ड शाळेला देण्यात आले यातूनच जेवण विविध खेळ, मनसोक्त गप्पा गोष्टी मुलांनी आपल्या मित्र मैत्रिणी सोबत दिवसभर आनंद घेतला याप्रसंगी  शाळेचे चेअरमन आण्णासो श्री. दगाजी वाघ यांचे सोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी एम जगताप सर(सेवा निवृत्त ) ,माजी सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री एस आर वाणी सर,श्री वाघ सर, श्री तुपे सर, श्री व्ही एन सोनवणे सर, श्री यु एस पाटील सर, श्री एस बी पाटील सर, श्री जी एन पाटील सर, श्री आर बी बोरसे सर, श्री बाविस्कर सर,श्री महाले गुरुजी,श्री नंदलाल पाटील भाऊसाहेब, श्री सोनजे सर, श्रीमती उषाताई साळुंखे, श्री शांताराम गुरुजी,कर्माचारी श्री हरिभाऊ पाटील सर्वान...

प्रिंट मिडिया,तसेच इतर प्रसार माध्यमांनी या तारखेपर्यंत च निवडणूकी करीता जाहिरात/प्रसिद्धी द्यावी -भारत निवडणुक आयोगाने काटेकोर पालन करण्याचे दिले आदेश

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) १९ व २० नोव्हेंबरला वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या  निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक   मिडीया,इलेक्ट्रॉनिक मीडियावर 18 तारखेच्या संध्याकाळपासून उमेदवारांना करता येणार नाही जाहिरात* जळगाव दि.11 ( जिमाका ) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने वर्तमान पत्रात 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. २०२४ मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापुर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसले अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना निवडणुक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.   कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका, २०२४ मतदानाच्या दिवशी म्हण...

बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !*डॉ. प्रियंका पाटील सुमित पाटील यांनी पालथा घातला मतदारसंघ किशोर आप्पा पाटील यांना वाढता प्रतिसाद

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) भडगाव ता.11: सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मुलगा सुमित व लेक डाॅ.प्रियंका पाटील यांनी वडिलांसाठी मतदारसंघ पालथा घातला आहे. दोन्ही दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचार फेरी पुर्ण केली आहे. त्यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ----------- पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सर्वच उमेदवार मतदारसंघ पायाखाली घालत आहे. मात्र त्यात आमदार तथा महायुतीचे उमेदवार आप्पा पाटील यांची लेक डाॅ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील याने मतदारसंघ पिंजून काढला.  *डाॅ.प्रियंका पाटलांनी पाचोरा तालुका काढला पिंजून* आमदार किशोर आप्पा पाटील यांची कन्या डाॅ.प्रियंका पाटील यांनी 18 तारखेपासून हरेश्वर पिंपळगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर संपुर्ण पाचोरा तालुका 21 दिवसात त्यांनी घरोघर पिंजून काढून बापासाठी मत मागीतले. त्यांना मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात शेकडोची रॅली निघाल्या. त्यांचे प्रत...

व्यापार वृध्दिसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणार- आमदार किशोर आप्पा पाटील

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा ता.11: पाचोरा मतदारसंघात व्यापार बांधवांच्या उद्योग वाढीसाठी मूलभूत सुविधांसोबतच भयमुक्त वातावरणामुळे व्यापार वाढीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झाली असून आपण पाचोरा शहरात व्यापारी बांधवांच्या मागणीप्रमाणे भव्य असे सर्व सुविधा युक्त व्यापारी भवन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निर्माण करू शकलो याचे आपल्याला मनस्वी समाधान असल्याचे भावना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बोलून दाखवली. --------------- पाचोरा शहरात जैनपाठ शाळेत रविवारी संध्याकाळी सहा वाजता झालेल्या व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक गांधीनगर महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, कांतीलाल जैन, मुन्ना राजपूत, नंदू सोमवंशी,संजय गोहिल, शरद पाटील राम केसवाणी,विनय सेठ, बापू सोनार आदि उपस्थित होते. आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, व्यापारी आणि माझे नेहमी घनिष्ठ संबध राहीले आहे. व्यापारी वृध्दिसाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीलो आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. प...

नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत,जनतेच्या प्रतिसादातून मिळाली परिवर्तनाची ग्वाही...

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर उभ्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त व अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले असून याप्रसंगी नागरिकांनी परिवर्तनाच्या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही दिली. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सायंकाळी नगरदेवळा गावातून भव्य प्रचार फेरी काढली. नगरदेवळा हे मतदारसंघातील मोठे व महत्वाचे गाव असल्याने येथे रात्री उशीरापर्यंत प्रचार फेरी चालली. यात ताईंनी गावातील सर्व देवस्थानांवर माथा टेकवत परिवर्तनासाठी साकडे घातले. यानंतर त्यांनी शहरातील कान्याकोपऱ्यात जाऊन मतदारांशी वार्तालाप केला. विकासाचे व्हिजन घेऊन आपण उमेदवारी करत असून यात नागरिकांनी समग्र विकासासाठी आपल्याला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, ठिकठिकाणी वैशालीताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. तर तरूणाईचा उत्साह हा शिगेला पोहचलेला असल्याने त्यांनी बहारदार नृत्य करून ताईंचे स्वागत केले. नगरदेवळा...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत मतदान यंत्र सरमिसळ (Second Randomization) प्रक्रीया मा.सर्व साधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांचे उपस्थितीत पार पडली.

Image
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत मतदान यंत्र सरमिसळ (Second Randomization) प्रक्रीया मा.सर्व साधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांचे उपस्थितीत पार पडली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे जिल्हास्तरीय प्रथम सरमिसळ (Randomization) नुसार एकुण 355 मतदान केंद्रसाठी खालील प्रमाणे मतदान यंत्रे प्राप्त झालेली आहे. अ.क्र बॅलेट युनिट संख्या 1 कंट्रोल युनिट संख्या 426 VVPAT 461 426 राखीव मतदान यंत्राचा तपशिल राखीव बॅलेट युनिट संख्या 71 राखीव कंट्रोल युनिट संख्या 71 राखीव VVPAT 106 वरील नमुद केल्याप्रमाणे प्राप्त झालेले बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व VVPAT चे एकुण 355 मतदान केंद्रामध्ये वाटप करण्यात येणार असून सदर मतदान यंत्रे हे कोणत्या मतदान केंद्रावर जाणार हे निश्चितीकामी सरमिसळ (Second Randomization) करण्याची प्रक्रीया हि आज दिनांक- 10/11/2024 रोजी मा.सर्व साधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांच्या प्रमुख उपस्थितीत व अमोल...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दुसरा प्रशिक्षण वर्ग संपन्न सदर प्रशिक्षण वर्गास मा.सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांनी दिली भेट

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दुसरा प्रशिक्षण वर्ग संपन्न सदर प्रशिक्षण वर्गास मा.सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांनी दिली भेट विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा झालेली आहे. त्यानुसार दिनांक-20/11/2024 रोजी मतदान होणार आहे. याकामी मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, जळगांव यांचे आदेशानुसार तालुक्यातील मतदान केंद्रासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी या पदी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची निवडणूक कामासाठी नेमणुक करणेत आलेली आहे. सदर नेमणुक करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण हे यापुर्वी त्यांच्या कार्यरत तालुक्यातच घेण्यात आलेले होते. आज विधानसभा निवडणूकामी नियुक्त केलेल्या इतर तालुक्यातील नियुक्त एकुण 1588 अधिकारी/कर्मचारी यांचा दुसरा प्रशिक्षण वर्ग हा निवडणूकीचे कामकाज करणे सुलभ व्हावे यासाठी दिनांक-10/11/2024 रविवार रोजी पाचोरा शहरातील MAIDC गोडावुन खत कारखाना गिरड, रोड पाचोरा येथे दोन सत्रात विस्तृत स्...