विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दुसरा प्रशिक्षण वर्ग संपन्न सदर प्रशिक्षण वर्गास मा.सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांनी दिली भेट
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दुसरा प्रशिक्षण वर्ग संपन्न सदर प्रशिक्षण वर्गास मा.सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांनी दिली भेट
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा झालेली आहे. त्यानुसार दिनांक-20/11/2024 रोजी मतदान होणार आहे. याकामी मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, जळगांव यांचे आदेशानुसार तालुक्यातील मतदान केंद्रासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी या पदी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची निवडणूक कामासाठी नेमणुक करणेत आलेली आहे. सदर नेमणुक करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण हे यापुर्वी त्यांच्या कार्यरत तालुक्यातच घेण्यात आलेले होते.
आज विधानसभा निवडणूकामी नियुक्त केलेल्या इतर तालुक्यातील नियुक्त एकुण 1588 अधिकारी/कर्मचारी यांचा दुसरा प्रशिक्षण वर्ग हा निवडणूकीचे कामकाज करणे सुलभ व्हावे यासाठी दिनांक-10/11/2024 रविवार रोजी पाचोरा शहरातील MAIDC गोडावुन खत कारखाना गिरड, रोड पाचोरा येथे दोन सत्रात विस्तृत स्वरुपात चित्रफितीव्दारे त्याचे सादरीकरण करुन पार पडला तर दुसरा टप्यात EVM मशीन हाताळणे (Handson Training) चे प्रशिक्षण हे गो. से. हायस्कुल. पाचोरा या ठिकाणी आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गास श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) मा. सर्वसाधारण निरीक्षक यांनी भेट दिली.
सकाळच्या पहिल्या सत्रात घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात एकूण 806 अधिकारी / कर्मचारी यांचेपैकी 782 अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले. तर 24 अधिकारी / कर्मचारी हे गैरहजर होते.
दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात एकुण 782 अधिकारी / कर्मचारी यांचेपैकी 747 अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले तर 35 अधिकारी कर्मचारी हे गैरहजर होते. गैरहजर असलेल्या एकुण 59 अधिकारी / कर्मचारी यांना प्रशासनाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.
तसेच दिनांक-10/11/2024 रोजी 18 पाचोरा विधानसभा मतदार संघा व्यतिरिक्त इतर मतदार संघात मतदार असलेल्या व निवडणूक कर्तव्यार्थ 18- पाचोरा विधानसभा मतदार संघात नेमणुक असलेल्या 699 त्यामध्ये चोपडा-98, रावेर - 117, जळगांव ग्रामीण -34, भुसावळ-50, जामनेर-99, चाळीसगांव-92, अमळनेर-126 व मुक्ताईनगर-83 टपाली मतदारांचा समावेश आहे. तसेच 18-पाचोरा विधानसभा मतदार संघातील 179 होमगार्ड व इतर मतदान अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या 298 महिला कर्मचारी असे एकुणात एकुण 1176 टपाली मतदारासाठी गो. से. हायस्कुल गिरड रोड, पाचोरा येथे टपाली मतदान सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आलेली असून सदर ठिकाणी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजे पावेतो टपाली मतदान प्रक्रीया पार पडली असून सदर टपाली मतदान सुविधा केंद्राची पाहणी ही श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) मा. सर्वसाधारण निरीक्षक (General Observer) यांनी केली. त्यानुसार एकुण 1176 पैकी इतर मतदार संघातील 699 पैकी 353 एवढे मतदान झाले, होमगार्ड 179 पैकी 172 एवढे मतदान झाले व महिला कर्मचारी 298 पैकी 81 एवढे मतदान झाले असे एकुण 606 एवढया टपाली मतदारांनी मतदान करूण आपला मतदानाचा हक्क बजावला.
या प्रसंगी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा श्री. भूषण अहिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, पाचोरा श्री. विजय बनसोडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, भडगांव श्रीमती शितल सोलाट, श्री. रणजीत पाटील निवडणूक नायब तहसिलदार, पाचोरा, श्री. विनोद कुमावत, निवासी नायब तहसिलदार, पाचोरा सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, व निवडणूक कामी नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment