बांबरुड राणीचे येथे बॅच सन 2004 गेट टुगेदर मोठ्या उत्साहात साजरे



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 दिनांक 6 नोव्हेंबर डॉ.राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी 2004 बॅच चे गेट-टुगेदर आयोजन करण्यात आले हा ग्रुप 2018 साली स्थापन झाला होता त्यातून मुलांनी  सर्व गुरु शिक्षक यांना कार्यक्रमाला बोलवून त्याठिकाणी एक छान संकल्पना मार्गदर्शन यावेळी सेवा निवृत्त शिक्षकांनी दिले,त्याचबरोबर सर्व मिळून स्वखर्चाने 10 ग्रीन व्हाईट बोर्ड शाळेला देण्यात आले यातूनच जेवण विविध खेळ, मनसोक्त गप्पा गोष्टी मुलांनी आपल्या मित्र मैत्रिणी सोबत दिवसभर आनंद घेतला याप्रसंगी  शाळेचे चेअरमन आण्णासो श्री. दगाजी वाघ यांचे सोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी एम जगताप सर(सेवा निवृत्त ) ,माजी सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री एस आर वाणी सर,श्री वाघ सर, श्री तुपे सर, श्री व्ही एन सोनवणे सर, श्री यु एस पाटील सर, श्री एस बी पाटील सर, श्री जी एन पाटील सर, श्री आर बी बोरसे सर, श्री बाविस्कर सर,श्री महाले गुरुजी,श्री नंदलाल पाटील भाऊसाहेब, श्री सोनजे सर, श्रीमती उषाताई साळुंखे, श्री शांताराम गुरुजी,कर्माचारी श्री हरिभाऊ पाटील सर्वानी हजेरी लावून मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्या दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .राहुल वाघ सर व श्रीकांत पाटील आभार प्रदर्शन श्री. नदीम मेवाती यांनी केले.  या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे प्राचार्य श्री. डी. व्ही. पाटील सर व उपस्थित मुलामुलींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद