विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत मतदान यंत्र सरमिसळ (Second Randomization) प्रक्रीया मा.सर्व साधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांचे उपस्थितीत पार पडली.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत मतदान यंत्र सरमिसळ (Second Randomization) प्रक्रीया मा.सर्व साधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांचे उपस्थितीत पार पडली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे जिल्हास्तरीय प्रथम सरमिसळ (Randomization) नुसार एकुण 355 मतदान केंद्रसाठी खालील प्रमाणे मतदान यंत्रे प्राप्त झालेली आहे.

अ.क्र बॅलेट युनिट संख्या

1

कंट्रोल युनिट संख्या

426

VVPAT

461

426

राखीव मतदान यंत्राचा तपशिल

राखीव बॅलेट युनिट संख्या

71

राखीव कंट्रोल युनिट संख्या

71

राखीव VVPAT

106

वरील नमुद केल्याप्रमाणे प्राप्त झालेले बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व VVPAT चे एकुण 355 मतदान केंद्रामध्ये वाटप करण्यात येणार असून सदर मतदान यंत्रे हे कोणत्या मतदान केंद्रावर जाणार हे निश्चितीकामी सरमिसळ (Second Randomization) करण्याची प्रक्रीया हि आज दिनांक- 10/11/2024 रोजी मा.सर्व साधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांच्या प्रमुख उपस्थितीत व अमोल पंडीतराव शिंदे, दिलीप ओंकार वाघ, वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी व मनोहर ससाणे हया उमेदवारांच्या प्रतिनिधी यांचे समक्ष मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठक सभागृहात पार पडली. सदर प्रक्रीयेवेळी मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. भूषण अहिरे, मा. सर्वसाधारण निरीक्षक यांचे सहाय्यक श्रीमती स्नेहा कुडचे संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव व श्रीमती शितल सोलाट, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व कामकाज पाहणारे संबंधित अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत होते.

सदर प्रक्रीया पार पाडल्यानंतर मतदार जनजागृती करणेकामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात काढण्यात आलेल्या रांगोळीची मा.सर्व साधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांनी पाहणी केली.

सदरची प्रेस नोट मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे मान्यतेने

देण्यात येत आहे.

ठिकाण :- पाचोरा.

दिनांक :- 10/11/2024.

(भूषण अहिरे)

18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा

CS CamScanner

2024.docx

निवडणूक निर्णय अधिकारी,

Rotate screen

Play

Share

Search

1

अ.क्र.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद