जैन सोशल ग्रुप तर्फ दोंडाईचा येथे आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न..!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा प्रतिनिधी:
दोंडाईचा:येथील जैन सोशल ग्रुप व स्व.ललीतादेवी रमेशचंद पारख यांच्या स्मरणार्थ गुडघ्याच्या व कंबरेच्या वेदनांना मुक्तता करण्यासाठी चिकित्सा शिबीर घेण्यात आले.यात अडीचशे पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.सदर शिबिराचे आयोजन दादावाडी येथे करण्यात आले होते.या शिबिरात राजस्थान राज्यातील जोधपुर येथील लक्ष्मीकांत पारख यांनी तपासणी केली. यांनी शिबिरार्थीना आयुर्वैदिक लेप लावून उपचार पद्धति समजून सांगितली. आयुर्वैदिक भुकटी लेप कसा  तयार करावा व लावावा याबद्दल मार्गदर्शन केले. या शिबिराला डूंगरचंद बाफना,धरमचंद बोथरा यांची उपस्थिती लाभली. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष गणेश कोटेचा, प्रकल्प प्रमुख रविन्द्र कोटडिया, सचिव दिनेश कर्नावट,रमेशचंद पारख, मनोज मालू, संजय दुग्गड, अनिल पारख, प्रदीप पारख, रितेश कवाड,सुमीत चतुरमुथा,महेंद्र बिनायक्या,जितेंद्र बिनायक्या,नरेंद्र छाजेड, मुकेश बेदमुथा,देवेन्द्र भंडारी, नरेंद्र  भंडारी, महेंद्र चोपडा, सुनिल  पारख, अमरीश चतुरमुथा,नवनीत रुणवाल,कमलेश  कांकरिया, रितेश पारख, राहुल पारख,विकास छाजेड,रितेश  गोलेच्छा यांनी परिश्रम  घेतले *✍️✍️ श्री पांडुरंग शिपी पत्रकार दोंडाईचा*.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद