शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा उपयोग तुम्ही जगाला बदलण्यासाठी करू शकता" युवा सामर्थ्य फाउंडेशन पाचोरा कडून जिल्हा परिषद मराठी शाळा, सिंधी कॉलनी येथे वह्या व पेन वाटप.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
ता:- 30 जून 2025
पाचोरा : युवा सामर्थ्य फाउंडेशन, पाचोरा यांच्या वतीने आज जिल्हा परिषद मराठी शाळा, सिंधी कॉलोनी येथे विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनिअर उमेश उर्फ बंटी हटकर हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात. यापूर्वी देखील त्यांनी वाचनालय, सेवा केंद्र यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत.

"शिक्षण हा वाघीणीचा दुध जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ...म्हणून शिका" भारतरत्न बाबासाहेब डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर.

या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश उर्फ बंटी हटकर, ॲडव्होकेट राजेंद्र वासवानी, शिवाजी हटकर, यश मोरे, पंकज पवार, आकाश केसवानी, जितेश नागरानी तसेच शाळेचे शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत फाउंडेशनचे अध्यक्ष इजि.बंटी हटकर यांनी पुढे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वाटर-प्युरिफायर व सामान्य झान ची पुस्तके देण्सास आश्वासीत केले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून उपस्थितांनी फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..